मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

भारत आणि सिंगापूर यांच्याद्वारे बेकायदेशीर, नोंदणी नसलेल्या आणि अनियंत्रित मासेमारीबाबत, पूर्व आशिया परिषद कार्यशाळेचे आयोजन


ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, न्यूझीलंड, कोरिया प्रजासत्ताक झाले कार्यक्रमात सहभागी

किनारपट्टीवरील मासेमारी समुदायांच्या सोबतीने बेकायदेशीर, नोंदणी नसलेल्या आणि अनियंत्रित मासेमारीचा सामना करण्याचे भारताचे आवाहन

Posted On: 13 APR 2022 10:32AM by PIB Mumbai

मत्स्यव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय, भारत सरकार आणि सिंगापूर सरकार यांनी काल  बेकायदेशीर, नोंदणी नसलेल्या (आययूयू) आणि अनियंत्रित मासेमारीबाबत, पूर्व आशिया परिषद कार्यशाळेचे (ईएएस) आभासी माध्यमातून आयोजन केले होते. भारत आणि सिंगापूरच्या अन्नधान्य संस्थेने (एसएफए) याचे सह अध्यक्षपद भूषवले. मत्स्यव्यवसाय विभागाचे (डीओएफ) सचिव, जतींद्र नाथ स्वेन, यांनी बीजभाषण केले. कार्यशाळेत 8 ईएएस सदस्य देश आणि 4 ज्ञान भागीदार, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, भारत सरकार, विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मत्स्यव्यवसाय अधिकारी आणि इतर निमंत्रित उपस्थित होते.

 

बेकायदेशीर, नोंदणी नसलेल्या आणि अनियंत्रित मासेमारीचा सामना करण्यासाठी तातडीच्या पावलांवर स्वेन यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रकाश टाकला. आययूयू मासेमारीचा सामना करण्यासाठी, विशेषत: किनारपट्टीवरील मासेमारी समुदायांच्या सोबतीने काम करण्याबाबतचे भारताचे प्रयत्न आणि उपक्रमही त्यांनी सामायिक केले.


मत्स्यव्यवसाय विभागाचे सहसचिव डॉ. जे बालाजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सत्राने कार्यशाळेची सुरुवात झाली. 


तांत्रिक  सत्रे आणि चर्चेनंतर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संयुक्त सचिव गीतिका श्रीवास्तव यांच्या भाषणाने वेबिनारचा समारोप झाला.

 

***

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1816314) Visitor Counter : 203