सांस्कृतिक मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माधवपूर घेड महोत्सवाला उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
13 APR 2022 9:16AM by PIB Mumbai
गुजरातमधील चार दिवसीय 'माधवपूर घेड मेळाव्या'ला आज तिसऱ्या दिवशी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भेट दिली. माधवपूर घेड महोत्सव हा भारतातील लोकांना जोडण्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. हा महोत्सव देशाच्या सुदूर पूर्व आणि पश्चिमेला एकत्र आणतो असे मंत्री महोदय यावेळी म्हणाले.
‘लुक ईस्ट धोरण’ हे सध्याच्या सरकारच्या काळातच ‘ऍक्ट ईस्ट धोरण’ बनले आहे. तसेच ईशान्य राज्यांनी पायाभूत सुविधा आणि इतर सुविधांमध्ये अभूतपूर्व विकास अनुभवला आहे असे ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांबाबत ठाकूर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारताचा लुप्त झालेला सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवित करण्यासाठी सक्रियपणे काम केले आहे. पंतप्रधानांच्या कार्यकाळात एकीकडे केदारनाथजी मंदिराचा भव्य विकास झाला आहे, तर दुसरीकडे सोमनाथ मंदिराच्या कामाने नवी उंची गाठली आहे असे ठाकूर म्हणाले. याबरोबरच काशी विश्वनाथ कॉरिडॉर, राम मंदिराचे बांधकाम आणि चार धामच्या सुशोभिकरणावर केंद्र सरकारने केलेल्या कामांची अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय त्यांच्या माध्यम संस्थांसह महोत्सवाला प्रोत्साहन देईल आणि त्याची भव्यता वाढवेल अशी ग्वाही अनुराग ठाकूर यांनी दिली.
***
ST/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1816261)
आगंतुक पटल : 275