आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित वस्तुसंग्रहालये उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आणि शिफारसी यांच्या संदर्भात नवी दिल्ली येथे दोन दिवसांची कार्यशाळा
Posted On:
12 APR 2022 8:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2022
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, शास्त्रीय आणि सांस्कृतिक संस्थेने नवी दिल्ली येथील युनेस्को भवन येथे ‘आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित वस्तूसंग्रहालये उभारण्याविषयीची मार्गदर्शक तत्वे आणि शिफारसी’ या विषयावर 11 आणि 12 एप्रिल 2022 या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. गेली अनेक वर्षे आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या संयुक्त सहकार्याने विविध विकासात्मक प्रकल्प राबविणाऱ्या यूएनडीपी अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाने या कार्यशाळेसाठी समन्वय साधला.
आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित वस्तूसंग्रहालये विकसित करण्याचा उपक्रम हा जगातील बहुतेक पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम असेल अशा शब्दात प्रशंसा करत युनेस्कोचे संचालक आणि प्रतिनिधी एरिक फाल्ट यांनी त्यांच्या भाषणात या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रयासासाठी भारत सरकारला गौरविले. हे काम अत्यंत गुंतागुंतीचे आहे असे सांगून ते म्हणाले की या उपक्रमासाठी प्राथमिक भागीदार म्हणून आदिवासी समुदायांची निवड करून आणि त्यांना अशा वस्तुसंग्रहालयांची संकल्पना, संरचना आणि काल्पनिक उभारणी यांच्या विकासात सहभागी करून घेऊन या प्रकल्पांची एकात्मता आणि आदिवासी समुदायांचा त्यावरचा मालकीहक्क सुनिश्चित करता येईल याविषयी विविध शिफारसी केल्या.
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे सचिव अनिलकुमार झा यांनी सांगितले की, स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासीच्या योगदानाला समाजात ओळख मिळवून देण्याच्या आणि आदिवासींचा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने या प्रकारची वस्तूसंग्रहालये उभारण्यात येत आहेत. या वस्तुसंग्रहालयांच्या विकासात पद्धतशीर दृष्टीकोन विकसित करणे आणि ही वस्तूसंग्रहालये स्थापन करताना आवश्यक असणाऱ्या समावेशक पद्धतींबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे हा या कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू होता.
आदिवासी संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, भारतीय मानववंशशास्त्र सर्वेक्षण संस्थेचे प्रतिनिधी, राष्ट्रीय पातळीवरील समितीचे सदस्य, राष्ट्रीय मानव संग्रहालयातील तज्ञ आणि भोपाळ येथील भारतीय वन व्यवस्थापन संस्थेचे प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते,
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1816158)
Visitor Counter : 240