कोळसा मंत्रालय

कोळसा मंत्रालयाने बंदिस्त खाणींतील कोळसा उत्पादनाचा (कॅप्टिव्ह कोल ब्लॉक्सच्या) घेतला आढावा


47 कोळसा ब्लॉक्सना खाण उघडण्याची दिली परवानगी; 2022-23 मध्ये ही संख्या 60 ब्लॉक्सपर्यंत वाढण्याची शक्यता

Posted On: 12 APR 2022 2:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2022

ज्या कोळसा ब्लॉक्सनी एकतर उत्पादन सुरू केले आहे किंवा ज्यांचे उत्पादन 2022-23 या आर्थिक वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे, अशा बंदिस्त कोळशाच्या साठ्याच्या (कॅप्टिव्ह कोळसा ब्लॉक्सच्या) वाटपासह कोळशाच्या उत्पादनात; कोळसा मंत्रालयाच्या नामनिर्देशित प्राधिकरणाने, आढावा घेतला आहे. यासाठी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोळसा विभागाचे सचिव डॉ.अनिल कुमार जैन होते.  2021-22 मध्ये कॅप्टिव्ह कोळसा ब्लॉक्समधून कोळशाचे उत्पादन 85 दशलक्ष मेट्रीक टन झाले होते, हे प्रशंसनीय असून, मागील वर्षातील म्हणजे  2020-21 मधील 63 मेट्रिक टन उत्पादनापेक्षा ते सुमारे 35% अधिक आहे.  वाढीव कोळसा उत्पादनामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी-पुरवठ्यातील तफावत कमी होण्यास मदत झाली.

कोळसा क्षेत्राचे उदारीकरण करणारे कायदे आणि नियमांमधील विविध सुधारणा, राज्य सरकार आणि प्रकल्प समर्थकांच्या नियमित आढावा बैठकांसह कोळसा खाणी कार्यान्वित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन युनिटची नियुक्ती तसेच विविध वैधानिक परवानग्या मिळवण्यापासून  ते  कोळसा खाणी सुरू करण्यापर्यंत अनेक उपक्रम बंदिस्त खाणींमधून कोळशाचे उत्पादन वाढवण्यासाठी, कोळसा मंत्रालयाने सातत्यपूर्ण पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

सध्या, सीएमएसपी (CMSP) कायदा, 2015 अंतर्गत मंत्रालयाच्या नामनिर्देशित प्राधिकरणाद्वारे 106 कोळसा खाणींचे वाटप करण्यात आले आहे आणि 47 कोळसा खाणींना उत्पादन सुरू करण्याच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात ही संख्या 60 कोळसा खाणींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.  परीचालीत कोळसा ब्लॉक्सची वार्षिक उच्च क्षमता सुमारे 230 मेट्रिक टन असेल आणि 2022-23 या आर्थिक वर्षात कोळसा उत्पादन 140 दशलक्ष टनांपेक्षा जास्त होईल, असा अंदाज आहे. या उपायांमुळे औष्णिक कोळशाच्या आयातीत लक्षणीय घट होईल आणि मोठ्या प्रमाणावर परकीय चलनाची बचत होईल.

बैठकीत डॉ. अनिल कुमार जैन म्हणाले की, कोळसा खाण वाटप करणार्‍यांना कोळसा उत्पादन वाढवण्याची सुवर्णसंधी आहे, कारण सध्या आयात कोळशाची किंमत खूप जास्त आहे आणि देशातील विजेची मागणी वाढल्याने औष्णिक कोळशाची मागणी वाढत आहे.

कॅप्टिव्ह कोळसा ब्लॉक्ससाठी 50% कोळशाच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे आणि कोळशाच्या उत्पादनात अंतिम- खाण प्रक्रिया सुरू नसली, तरीही कोळशाच्या उत्पादनात अडथळा येणार नाही.  व्यावसायिक खाणकामासाठी नवीन कोळसा ब्लॉक्सचे वाटप केले जात आहे आणि संभाव्य बोलीदारांनी या ब्लॉक्ससाठी उत्साहवर्धक प्रतिसाद दर्शविला आहे. यापैकी काही ब्लॉक्सनी वाटप झाल्यानंतर एका वर्षातच कोळसा उत्पादन सुरू केले आहे.

 
S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1815983) Visitor Counter : 310