पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंधन संवर्धन व उर्जा कार्यक्षमता यांचा संदेश पोहचवण्यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्थेच्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 11 APR 2022 7:24PM by PIB Mumbai

 

पेट्रोलियम आणि नैसर्गीक वायू मंत्रालयाचे सचिव  आणि  पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्थेचे अध्यक्ष  (PCRA) पंकज जैन यांनी आज पेट्रोलियम आणि नैसर्गीक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीतील पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्थेच्या  सक्षम या वार्षिक जनकेंद्री महा-मोहिमेचा प्रारंभ केला. 'हरित आणि स्वच्छ उर्जेच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव / हरित आणि  स्वच्छ ऊर्जेचा वापर करा , स्वातंत्र्याचा   अमृत महोत्सव साजरा करा हे घोषवाक्य असलेली ही मोहीम 30 एप्रिल 2022 पर्यंत सुरु राहणार आहे. ही इंधन संवर्धन आणि उर्जा सक्षमता यांचा संदेश लोकांमध्ये पोचवणे व स्वच्छ हरित भारताच्या उभारणीस सहाय्य तसेच इंधन/क्रूड इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे यासाठीची ही प्रमुख जनजागृती मोहिम आहे. 

 

आपल्या सुरुवातीच्या भाषणात जैन यांनी इंधन संवर्धनाच्या महत्वावर  भर दिला आणि सक्षमसारख्या पूर्ण लक्ष्यकेंद्री कार्यक्रमाची गरज अधोरेखित केली. आपल्या दररोजच्या जीवनात इंधन संवर्धन मंत्र अंगीकारण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. या प्रसंगी पंकज जैन यांनी ग्रामीण भागात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्थेच्या चाकांवरील संदेश, ऑडियो, विडियो आणि छापील पत्रके यामार्फत इंधन संवर्धनासाठी असलेल्या जनजागृती मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. या कार्यक्रमात द्रवरुप पेट्रोलियम वायू  प्रकल्पाचे उर्जा कार्यक्षमता निर्देशांक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आणि त्यासंबधीच्या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.

 

 

यावेळी इंधन संवर्धनाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल; सर्वोत्तम उर्जा कार्यक्षमता निर्देशांक राखणारे द्रवरुप पेट्रोलियम वायू प्रकल्प, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्थेने निर्धारित केलेल्या मापदंडानुसार उर्जा लेखापरिक्षण राबवणारे सर्वोत्तम उद्योग, राज्य सरकारांचे तेल व वायू क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्या यांना पुरस्कार  देण्यात आले. तसेच उर्जा कार्यक्षमतेसाठी  राज्य परिवहन महामंडळांनाही पुरस्कार देण्यात आले. 

सक्षम-2022 अंतर्गत पेट्रोलियम संवर्धन संशोधन संस्थेने तेल  आणि वायू क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांसाठी अनेक कार्यक्रम व उपक्रम देशभरात आखले आहेत.

***

S.Kane/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1815735) आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil