आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 185 कोटी 70 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.


12 ते 14 वर्ष वयोगटातील किशोरावयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 2 कोटी 21 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 11,132 आहे.

गेल्या 24 तासांत देशात 1,054 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.23%

Posted On: 10 APR 2022 11:42AM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 185 कोटी 70 लाखांचा (1,85,70,71,655) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,24,70,964 सत्रांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.21 कोटीहून अधिक (2,21,97,507) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या गटनिहाय विभागणीत खालील मात्रांचा समावेश आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404094

2nd Dose

10005052

Precaution Dose

4535831

FLWs

1st Dose

18413918

2nd Dose

17520574

Precaution Dose

7011000

Age Group 12-14 years

1st Dose

22197507

Age Group 15-18 years

1st Dose

57640927

2nd Dose

39568354

Age Group 18-44 years

1st Dose

555041746

2nd Dose

470088524

Age Group 45-59 years

1st Dose

202819672

2nd Dose

186252868

Over 60 years

1st Dose

126791035

2nd Dose

116012655

Precaution Dose

12767898

Precaution Dose

2,43,14,729

Total

1,85,70,71,655

 

देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन 11,132 झाली आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या केवळ 0.03% आहे.

परिणामी, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.76% आहे. गेल्या 24 तासांत 1,258 रुग्ण बरे झाले आहेत आणि बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या सुरुवातीपासून) आता 4,25,02,454 वर आहे.

गेल्या 24 तासांत 1,054 नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,18,345 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 79.38 कोटीहून अधिक (79,38,47,740) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.23% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील 0.25%  इतका नोंदला गेला आहे.

***

Jaydevi PS/V.Joshi/P.Kor



(Release ID: 1815375) Visitor Counter : 154