संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पिनाका एमके -I (विस्तारित) रॉकेट प्रणाली आणि पिनाका एरिया डिनायल म्युनिशन्स रॉकेट प्रणालीची डीआरडीओ आणि लष्कराकडून यशस्वी चाचणी

Posted On: 09 APR 2022 7:23PM by PIB Mumbai

 

पिनाका एमके -I (विस्तारित) रॉकेट प्रणाली आणि पिनाका एरिया डिनायल म्युनिशन्स रॉकेट प्रणालीची पोखरण रेंजवर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डीआरडीओ आणि लष्कराकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली. मागील पंधरा दिवसात एकूण  24 ईपीआरएस  अग्निबाण  डागण्यात आले.आवश्यक अचूकता आणि सातत्यपूर्णतेची सर्व  उद्दिष्टे समाधानकारकपणे पूर्ण करण्यात आली.  या चाचण्यांसह , उद्योगाद्वारे ईपीआरएस तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रारंभिक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे आणि उद्योग भागीदार रॉकेट प्रणालीच्या वापरकर्ता चाचण्या/श्रेणी  उत्पादनासाठी तयार आहेत.

पिनाका रॉकेट प्रणाली पुण्याच्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट यांनी विकसित केली आहे आणि याला  डीआरडीओची आणखी एक पुणेस्थित प्रयोगशाळा हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरीने सहाय्य पुरवले आहे.

ईपीआरएस  ही पिनाका व्हेरियंटची अद्यनीत  आवृत्ती आहे जी गेल्या दशकापासून भारतीय लष्कराच्या सेवेत आहे. उदयोन्मुख गरजा पूर्ण करण्यासाठी पल्ला  वाढविणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानासह प्रणाली अद्ययावत  केली गेली आहे. या मोहिमेदरम्यान डीआरडीओ कडून तंत्रज्ञान हस्तांतरण  अंतर्गत एमआयएल द्वारे निर्मित रॉकेटची उड्डाण चाचणी घेण्यात  आली. पिनाका रॉकेट प्रणालीत वापरला जाणारा शस्त्रसाठा  आणि फ्यूजच्या विविध प्रकारांची  पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली.

संरक्षण संशोधन आणि विकास  विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी प्रगत तंत्रज्ञानावर आधारित नवीन डिझाइन रॉकेटच्या उड्डाण चाचण्या विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल सहभागी चमूचे अभिनंदन केले आहे.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815258) Visitor Counter : 339