युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

क्रीडाक्षेत्रातून अमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी योजलेल्या युनेस्कोच्या निधीतील भारताचा सहभाग म्हणून 2022 मध्ये क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्रालयाने दिले 72,124 डॉलर्सचे योगदान

Posted On: 07 APR 2022 8:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2022

पॅरिसमध्ये 29 ते 31 सप्टेंबर  2019 या कालावधीत भरलेल्या 7व्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ठरावाअंतर्गत  सहभागी देशांनी युनेस्कोच्या क्रीडाक्षेत्रातून अमली पदार्थ हद्दपार करण्यासाठीच्या निधीत आपल्या देशाच्या नियमित अर्थसंकल्पाच्या 1 टक्के योगदान  देण्यावर सहमती दर्शवली होती.

या ठरावाशी कटीबद्धता राखत आणि पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात 26 ते 28 ऑक्टोबर 2021मध्ये भरलेल्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या आठव्या सत्रात (COP8) झालेल्या ठरावानुसार भारत सरकारच्या क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्रालयाने वर्ष 2022 मध्ये क्रीडाक्षेत्रातून अमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी युनेस्कोच्या निधीत भारताच्या निर्धारित सहभागापेक्षा दुप्पट म्हणजे 72,124 अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले. भारत सरकारच्या क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्रालयाने युनेस्कोच्या विनंतीवरून  2021 मध्ये प्रथम 28,172  अमेरिकन डॉलर्सचे योगदान  युनेस्कोच्या निधीत जमा केले होते.

युनेस्कोने याबद्द्ल भारताचे आभार मानत क्रीडाक्षेत्रातून अमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी भारत सरकारची कटीबद्धता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.

 

 

 

 

 

S.Kulkarni/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1814611) Visitor Counter : 172