गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज विज्ञान भवन, दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) द्वारा आयोजित 'आपत्ती प्रतिसादासाठी क्षमता निर्मिती - 2022 ' वरील वार्षिक परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
2016 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमएची एनडीएमपी योजना सुरू केली, ही देशातील पहिली राष्ट्रीय आपत्ती योजना आहे आणि सेंदाई आपत्ती जोखीम निवारण चौकट -2015 ते 2030 च्या सर्व निकषांशी अनुरूप आहे
प्रथमच सरकारमधील सर्व यंत्रणा, विभागांच्या व्यापक एकत्रीकरणाचे नियोजन करण्यात आले आणि त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे
प्रविष्टि तिथि:
07 APR 2022 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2022
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीएमए) , सर्व मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्य आपत्ती निवारण दल (एसडीएमए ) आणि सर्वसमावेशक एकात्मिक दृष्टीकोनातून, केंद्र आणि राज्य सरकारांनी आत्मविश्वासाने आपत्ती व्यवस्थापन केले आहे.
आतापर्यंत 32 मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली असून, त्यापैकी आठ मार्गदर्शक तत्त्वे गेल्या अडीच वर्षांत आखण्यात आली आहेत.

अनेक ॲप्सदेखील तयार करण्यात आली आहेत, चक्रीवादळ, अतिवृष्टी, उष्णता आणि थंडीची लाट यांसारख्या सर्व गोष्टींसाठी हवामान ॲपउपलब्ध आहे, शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी व्यवस्थापनासाठी मेघदूत ऍप बनवले आहे, तर विजांच्या गडगडाटाबाबत (लाइटनिंग) पूर्वसूचना देण्यासाठी दामिनी ऍपची निर्मिती केली आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज विज्ञान भवन, दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) द्वारा आयोजित 'आपत्ती प्रतिसादासाठी क्षमता निर्मिती - 2022 ' वरील वार्षिक परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृह सचिव आणि एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात, केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, सर्वांगीण एकात्मिक दृष्टिकोन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीएमए) , सर्व मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्य आपत्ती निवारण दल (एसडीएमए ) यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांनी आत्मविश्वासाने आपत्ती व्यवस्थापन केले आहे . नव्वदच्या दशकापूर्वी, आपल्याकडे मदत-केंद्रित दृष्टीकोन होता, जीवित आणि वित्तहानी रोखण्याला वाव नव्हता आणि तो नियोजनाचा देखील भाग नव्हता. आता आम्ही पूर्वसूचना , सक्रिय प्रतिबंध आणि पूर्व तयारीच्या आधारे जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी वैज्ञानिक कार्यक्रमावर बरेच काम केले आहे. आज जगातील आपत्ती निवारण क्षेत्रात आपण बरोबरीने उभे आहोत आणि अनेक क्षेत्रात तर सर्वांच्या पुढे आहोत.
अमित शहा म्हणाले की, 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमएची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना सुरू केली, ही देशातील पहिली राष्ट्रीय आपत्ती योजना आहे आणि सेंदाई आपत्ती जोखीम निवारण चौकट -2015 ते 2030 च्या सर्व निकषांशी अनुरूप आहे. प्रथमच सरकारमधील सर्व यंत्रणा, विभागांच्या व्यापक एकत्रीकरणाचे नियोजन करण्यात आले आणि त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे.
एनडीआरएफच्या कार्याची प्रशंसा करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, देशात कुठेही, कोणत्याही भागात कुठल्याही प्रकारची आपत्ती कोसळते आणि जेव्हा लोकांना कळते की एनडीआरएफ एसडीआरएफसह आले आहे, तेव्हा त्यांच्या निम्म्या चिंता दूर होतात. सरकारी परिपत्रकांद्वारे हा विश्वास निर्माण होऊ शकत नाही, तर कृतीतून निर्माण होतो. शेजारी देशांना अनेकदा भेट देऊनही, एनडीआरएफने मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत केली आहे.
अमित शाह म्हणाले की, 2000 ते 2022 हा काळ भारतातील आपत्ती व्यवस्थापनासाठी सुवर्ण काळ मानला जाईल.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत आणि राज्य सरकारांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्य आपत्ती निवारण दलांची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत 21,000 हून अधिक एसडीआरएफ जवानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ते म्हणाले की, आतापर्यंत 32 मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली असून, त्यापैकी आठ मार्गदर्शक तत्त्वे गेल्या अडीच वर्षांत आखण्यात आली आहेत. थंडीची लाट , भूकंप संबंधी अंदाज , छताला थंडावा देण्यासाठी घरमालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, हिमनदी सरोवराचा पूर, उष्णतेची लाट , भूस्खलनाचा धोका, अपंगत्व समावेशक आपत्ती जोखीम कमी करणे, आपत्तीग्रस्त कुटुंबांसाठी तात्पुरती घरे, या 8 मार्गदर्शक तत्त्वांची राज्यांमध्ये अंमलबजावणी करण्याचे कामही पूर्ण झाले आहे. पंतप्रधानांनी सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारही सुरू केला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपत्ती व्यवस्थापनाला राष्ट्रीय स्तरावर अशी मान्यता मिळाली असून पहिला पुरस्कार संस्था म्हणून एनडीआरएफच्या 8 व्या बटालियनला यावर्षी 23 जानेवारी रोजी देण्यात आला आहे.
अनेक ॲप्स देखील तयार करण्यात आले आहेत, चक्रीवादळ, अतिवृष्टी, उष्णता आणि थंडीची लाट यांसारख्या सर्व गोष्टींसाठी हवामान ॲप उपलब्ध आहे, शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी व्यवस्थापनासाठी मेघदूत ऍप बनवले आहे, तर विजांच्या गडगडाटाबाबत (लाइटनिंग) पूर्वसूचना देण्यासाठी दामिनी ऍपची निर्मिती केली आहे.
हे ऍप तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी एक यंत्रणा असणे गरजेचे आहे. कारण ज्या पूर्वसूचना येतात त्या अगदी अचूक असतात आणि वेळेपूर्वी येतात. मोठ्या आपत्तींदरम्यान आपण चांगले काम करतो, परंतु विजेसारख्या आपत्तीं प्रसंगी वेळ कमी असतो, त्यामुळे आपली यंत्रणा अचूक आणि ती वास्तविक वेळेनुसार असावी,असे ते म्हणाले.
S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1814605)
आगंतुक पटल : 417