आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 185 कोटी 20 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 2 कोटी 04 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 11,639

गेल्या 24 तासांत देशात 1,033 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.22% आहे

Posted On: 07 APR 2022 9:27AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 07 एप्रिल 2022


आज सकाळी वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसारभारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 185 कोटी 20 लाखांचा (1,85,20,72,469)  टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,23,20,478 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
 
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत कोटी 04 लाखांहून अधिक (2,04,40,247किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
 
आज सकाळी वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसारआतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय खालीलप्रमाणे आहे:
 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403951

2nd Dose

10003375

Precaution Dose

4506652

FLWs

1st Dose

18413677

2nd Dose

17517313

Precaution Dose

6959375

Age Group 12-14 years

1st Dose

20440247

Age Group 15-18 years

1st Dose

57491065

2nd Dose

39046615

Age Group 18-44 years

1st Dose

554905338

2nd Dose

468620860

Age Group 45-59 years

1st Dose

202798184

2nd Dose

185937186

Over 60 years

1st Dose

126775913

2nd Dose

115815818

Precaution Dose

12436900

Precaution Dose

2,39,02,927

Total

1,85,20,72,469

 

 

 देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन 11,639 झाली आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या केवळ 0.03% आहे.

 
 

 


परिणामीभारतातील रोगमुक्ती दर आता 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,222 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळेदेशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,98,789 झाली आहे.
 


 
 

गेल्या 24 तासांतदेशात 1,033 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.
 

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,82,039 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 79 कोटी 25 लाखांहून अधिक (79,25,09,451) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशातील साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.22% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील  0.21%.इतका नोंदला गेला आहे.

***
 

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1814360) Visitor Counter : 213