PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 04 APR 2022 6:50PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 184.70 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 12,597
  • Active cases stand at 0.03%
  • Recovery Rate currently at 98.76%
  • 1,316 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,24,95,089
  • 913 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.29%)
  • Weekly Positivity Rate (0.22%)
  • 79.10 cr Total Tests conducted so far; 3,14,823 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

graphic on covid 19 updates

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 4 एप्रिल 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

भारताने कोविड विरोधी लढ्यात महत्वपूर्ण टप्पा पार केला असून, सक्रीय रुग्णभार (12,597) सातत्याने कमी होत असून 714 दिवसांनंतर सध्या तो 13,000 पेक्षा  कमी झाला आहे. सक्रीय रुग्णभार देशाच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतका आहे. 18 एप्रिल 2020 रोजी सक्रीय रुग्णभार 12,974 होता.

दुसरी  एक  महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य करत, भारतात नव्या 913 रुग्णांची नोंद 715 दिवसांनंतर झाली असून ती 1000 च्या खाली आली आहे. 18 एप्रिल 2020 रोजी 991 रुग्णसंख्या होती. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,316 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,24,95,089 झाली आहे. दिवसभरात 10 पेक्षा कमी रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात एकूण 3,14,823  कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 79.10 (79,10,79,706) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.22% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.29% आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 184.70 (1,84,70,83,279)  कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण 2,21,87,532 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे. वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत 1.86 (1,86,39,260) कोटींपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक लस मात्रा दिल्या आहेत.

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 15.55 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयोगी मात्रा शिल्लक आहेत.

 

* * *

S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813337) Visitor Counter : 161