युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या राज्य फेरीतील विजेत्यांची नावे जाहीर, विजेत्यांना आता करावी लागणार राष्ट्रीय फेरीच्या विजेतेपदासाठी स्पर्धा
Posted On:
04 APR 2022 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2022
फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या राज्य फेरीतून 36 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे आणि ते आता आगामी राष्ट्रीय फेरीत त्यांच्या संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतील. राज्य फेरीत महाराष्ट्रातील मुंबई शहर जिल्यातील पी.जी. गरोडिया स्कूल (आयसीएसई)चे तनय गौतम शेठ आणि आकाश विश्वनाथ आणि -गोव्यातील दक्षिण गोवा जिल्यातील नेव्ही चिल्ड्रन स्कूलचे झियान चरणिया आणि तुहाश्री अनिल रावल हे विजेते ठरले आहेत.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या राज्य अंतिम फेरीत पात्र 359 शाळांनी सहभाग घेतला होता, कारण त्यांनी आपापले राज्य विजेते होण्यासाठी स्पर्धा केली होती. राज्य विजेत्या संघाला प्रत्येकी 2.75 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले (25 हजार रुपये + 2.5 लाख रुपये सहभागी आणि त्यांच्या शाळेसाठी) आणि आता आगामी फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या राष्ट्रीय फेरीत ते त्यांच्या संबंधित राज्यांचे प्रतिनिधित्व करतील.
प्रत्येक राज्य अंतिम फेरीतील मधील प्रथम आणि द्वितीय उपविजेत्याला अनुक्रमे रु. 1.1 लाख (रु. 10 हजार + रू. 1 लाख) आणि रु. 55,000 (रु. 5 हजार + रू. 50 हजार) ची रोख पारितोषिके देण्यात आली आणि ते त्यांच्या राज्यात द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर राहिले.
36 शालेय संघ (प्रत्येक राज्य आणि/किंवा केंद्रशासित प्रदेशातील विजेते) आता राष्ट्रीय राजधानी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय फेरीत सहभागी होतील आणि त्याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्सवर केले जाईल आणि विविध सोशल मीडिया चॅनेलवर वेबकास्टही केले जाईल.
राष्ट्रीय प्रश्नमंजुषेचे विजेते स्वतःसाठी आणि त्यांच्या शाळेसाठी अतिरिक्त रोख बक्षिसे जिंकतील आणि भारताचा पहिला फिट इंडिया प्रश्नमंजुषा विजेता होण्याचा मानही त्यांच्याकडे असेल.
फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या राज्य फेरीतील विजेते जाणून घेण्यासाठी कृपया इंग्रजी प्रसिद्धीपत्रक येथे पहा
* * *
Jaydevi PS/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1813313)
Visitor Counter : 231