संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाची वार्षिक दुरुस्ती परिषद आणि वर्ष 2022 साठी वार्षिक पायाभूत सुविधा आणि स्वदेशीकरण परिषद

प्रविष्टि तिथि: 03 APR 2022 2:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2022

 

भारतीय नौदलाची वार्षिक दुरुस्ती परिषद आणि 2022 सालासाठी वार्षिक पायाभूत सुविधा आणि स्वदेशीकरण परिषदेचे उद्घाटन व्हाईस अॅडमिरल एमए हम्पीहोली, एव्हीएसएम, एनएम, फ्लॅग ऑफिसर, दक्षिण नौदल कमांडचे कमांडिंग-इन-चीफ, यांच्या हस्ते नौदलाच्या दक्षिण कमांड मुख्यालयात कोची येथे 31 मार्च 2022 रोजी करण्यात आले.

व्हाईस अॅडमिरल संदीप नैथानी, एव्हीएसएम, व्हीएसएम, मटेरिअलचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत नौदल मुख्यालयाच्या प्रतिनिधींसोबतच सर्व कमांड, डॉकयार्ड्स/रिपेअर यार्ड्स आणि मटेरियल ऑर्गनायझेशन्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. आत्मनिर्भर भारत या सरकारी उपक्रमाच्या अनुषंगाने, यावर्षीच्या परिषदांमध्ये स्वदेशीकरणाला समर्पित एक सत्र होते. मटेरिअलच्या प्रमुखांनी मंचाला संबोधित करताना संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक खासगी संबंध बळकट करण्याच्या गरजेवर भर दिला. दुरुस्ती प्रक्रियेवर चर्चा, जहाजांना कोणत्याही आव्हानांसाठी सज्ज ठेवण्यासाठी देखभाल धोरणांमध्ये परिवर्तन करण्यावर चर्चा आणि नौदलाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या वाढीचा आढावा, या परिषदेत घेण्यात आला. 

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1812944) आगंतुक पटल : 337
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil