दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंटरनेट सुविधा असलेली गावे
प्रविष्टि तिथि:
01 APR 2022 4:57PM by PIB Mumbai
दूरसंचार सेवा प्रदाता आणि दूरसंचार विभागाच्या क्षेत्रीय एककांनी दिलेल्या माहितीनुसार, (2011 च्या जनगणनेप्रमाणे) 5,97,618 निवासी गावांपैकी 5,58,537 गावांमधे मोबाईल वायरलेस ब्राॅड बॅन्ड सेवा कार्यरत असल्याचे अनुमान आहे.
या व्यतिरिक्त भारत नेट प्रकल्प देशातील सर्व ग्राम पंचायत (जीपीएस) आणि गावांमध्ये कार्यरत असून उच्च वेगाचे इंटरनेट/ब्रॉडबँड उपलब्ध करून देत आहे. 28.02.2022 रोजी एकूण 1,72,361 ग्रामपंचायतींसाठी भारतनेट अंतर्गत ब्रॉडबँड पायाभूत सुविधेसह सेवासज्ज करण्यात आले.
इंटरनेट सुविधेचे परीचालन ग्राहकांच्या संख्येच्या आधारावर उपलब्ध केले जाते. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची उपलब्धता शिक्षण आणि आरोग्य सेवेसह सर्व प्रकारच्या ऑनलाइन डिजिटल सेवा मिळवून देण्यासाठी सक्षम करते.
ही माहिती दूरसंचार मंत्रालयाचे राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे दिली.
***
S.Kakade/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1812361)
आगंतुक पटल : 250