नागरी उड्डाण मंत्रालय
इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डयन प्रशिक्षण अकादमीने आतापर्यंतचे सर्वाधिक उड्डाणाचे तास केले पूर्ण
आयजीआरयूएने दरवर्षी प्रति विमान वापर 1000 तासांहून अधिक असा विमान वापराचा केला विक्रम
Posted On:
01 APR 2022 11:12AM by PIB Mumbai
इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डयन अकादमी (आयजीआरयूए), भारतातील सर्वात मोठी हवाई उड्डयन प्रशिक्षण अकादमी असून, 2021-22 मध्ये 19,000 उड्डाण तासांचे लक्ष्य तिने पूर्ण केले आहे. आयजीआरयूएची स्थापना 1986 मधे झाली. तेव्हा पासूनचे सर्वाधिक उड्डाण तास तिने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये पूर्ण केले आहेत, हे एकूण 19,110 उड्डाण तास आहेत. याआधी 2013-14 मध्ये या सर्वाधिक उड्डाण तास 18,776 होते. परंतु तेव्हा 24 विमानांचा ताफा होता तर आता 18 विमानांचा ताफा आहे.
आयजीआरयूएचा 2021-22 मध्ये प्रति विमान वापर दरसाल 1062 तास आहे. आयजीआरयूएच्या इतिहासात प्रथमच आयजीआरयूएने प्रति विमान दरसाल 1000 तास वापराचा जादुई आकडा पार केला आहे. याआधी 2013-14 मध्ये प्रति विमान वापर 782 तास असा उच्चांक होता.
आयजीआरयूएने, कोविड-19 सारख्या गंभीर संकटातही 2020-21 मध्ये, 13,282 उड्डाण तास पूर्ण केले आणि 62 व्यावसायिक वैमानिक परवाना (सीपीएल) धारक तयार केले. 2019-20 च्या कोविडपूर्व वर्षाच्या कामगिरीशी तुलना करता ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल. तेव्हा आयजीआरयूएने 14,830 तास पूर्ण केले होते आणि 67 सीपीएल धारक तयार केले होते.
आयजीआरयूए 2022-23 मध्ये 20,000 उड्डाण तास पूर्ण करण्याची शक्यता आहे.
*****
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1812235)
Visitor Counter : 213