आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 184 कोटी 06 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 1 कोटी 60 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 14,307

गेल्या 24 तासांत देशात 1,225 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.23% आहे

Posted On: 31 MAR 2022 3:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मार्च 2022

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 184 कोटी 06 लाखांचा (1,84,06,55,005) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,19,86,205 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 1 कोटी 60 लाखांहून अधिक किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या गटनिहाय विभागणीत खालील मात्रांचा समावेश आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403635

2nd Dose

9999355

Precaution Dose

4455582

FLWs

1st Dose

18413143

2nd Dose

17508690

Precaution Dose

6858397

Age Group 12-14 years

1st Dose

16081696

Age Group 15-18 years

1st Dose

57108229

2nd Dose

37947928

Age Group 18-44 years

1st Dose

554549678

2nd Dose

465540817

Age Group 45-59 years

1st Dose

202738270

2nd Dose

185239023

Over 60 years

1st Dose

126729917

2nd Dose

115382831

Precaution Dose

11697814

Precaution Dose

2,30,11,793

Total

1,84,06,55,005

देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन 14,307 झाली आहेदेशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या केवळ 0.03% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,594 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,89,004 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 1,225 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 6,07,987 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78 कोटी 91 लाखांहून अधिक (78,91,64,922) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 देशातील साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.23% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील  0.20%.इतका नोंदला गेला आहे.

  

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1811926) Visitor Counter : 240