अर्थ मंत्रालय
आकस्मिक कर्ज हमी योजनेची (ECLGS) व्याप्ती वाढली तर वैधता 31.3.2023 पर्यंत वाढवण्यात आली
सरकारच्या आकस्मिक कर्ज हमी योजनेअंतर्गत आदरातिथ्य , नागरी विमान वाहतूक आणि संबंधित उद्योगांना मोठा दिलासा
ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत अतिरिक्त कर्ज सहाय्य फंड आणि नॉन-फंड आधारित थकीत कर्जाच्या विद्यमान 40% वरून 50% पर्यंत वाढवले
नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील पात्र कर्जदारांना आता बिगर निधी आधारित आकस्मिक कर्ज सुविधांचा लाभ घेण्याची अनुमती
Posted On:
30 MAR 2022 9:28PM by PIB Mumbai
केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये केलेल्या घोषणेनुसार, नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड (NCGTC) ने आज आकस्मिक कर्ज हमी योजनेचा कालावधी (ECLGS) मार्च 2023 पर्यंत वाढवला .
तसेच, 25 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्र्यांनी प्रवास, पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्र आणि नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील नागरी विमान वाहतूक क्षेत्राच्या शिष्टमंडळासोबत केलेल्या अर्थसंकल्प पश्चात सल्लामसलतींमध्ये प्राप्त सूचनांचा पाठपुरावा करून, नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेडने ईसीएलजीएस 3.0 साठी देखील मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा जारी केल्या.
या पार्श्वभूमीवर आदरातिथ्य, प्रवास, पर्यटन आणि नागरी उड्डाण क्षेत्राशी संबंधित ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत लाभांची व्याप्ती आणि प्रमाण खालीलप्रमाणे वाढविण्यात आले आहे:
i ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत समाविष्ट क्षेत्रांमधील ज्या नवीन कर्जदारांनी 31.3.2021 ते 31.1.2022 या कालावधीत कर्ज घेतले आहे, ते देखील आता ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत आकस्मिक कर्ज सुविधांचा लाभ घेण्यास पात्र असतील.
i ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत मिळू शकणार्या आकस्मिक कर्ज सुविधांची व्याप्ती ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व क्षेत्रातील पात्र कर्जदारांसाठी वाढवण्यात आली आहे. अशा सर्व क्षेत्रातील पात्र कर्जदारांना (नागरी विमान वाहतूक क्षेत्राव्यतिरिक्त) दोन संदर्भ तारखांना (29.2.2020 आणि 31.3.2021) त्यांच्या फंड-आधारित थकबाकीच्या 40% च्या आधीच्या मर्यादेच्या तुलनेत आता तीनपैकी कोणत्याही संदर्भ तारखांना (29.2.2020, 31.3.2021 आणि 31.1.2022) त्यांच्या सर्वोच्च निधी आधारित कर्जाच्या 50% पर्यंत कर्ज घेण्याची परवानगी आहे. सध्याच्या मर्यादा प्रति कर्जदार कमाल 200 कोटी रुपयांच्या अधीन आहे.
ii नागरी विमान वाहतूक क्षेत्राच्या एकूण कर्जामधील बिगर -फंड आधारित कर्जाचे उच्च प्रमाण लक्षात घेऊन, नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील पात्र कर्जदारांना आता ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत बिगर -फंड आधारित आकस्मिक कर्ज सुविधांचा लाभ घेता येईल. . दोन संदर्भ तारखांपैकी कोणत्याही एका तारखेला त्यांच्या निधी-आधारित थकबाकीच्या 40% पर्यंत जास्त लाभ घेण्याच्या पूर्वीच्या मर्यादेच्या तुलनेत ते आता वर नमूद केलेल्या तीन संदर्भ तारखांपैकी कोणत्याही तारखेला सर्वाधिक एकूण निधी आणि नॉन-फंड आधारित कर्जाच्या 50% पर्यंत कर्ज घेऊ शकतात. तसेच बिगर -फंड-आधारित कर्ज , बँक हमी , लेटर ऑफ क्रेडिट आणि ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत मंजूर इतर बिगर फंड-आधारित सुविधांचा लाभ घेण्याचा खर्च कमी करण्यासाठी कोणत्याही रोख मार्जिनशिवाय जारी केले जातील आणि फी/कमिशन वर वार्षिक 0.5% ची मर्यादा राहील. .
iv ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील व्यक्ती आणि मालकी कम्पन्या आता आकस्मिक कर्ज सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
v. यासंदर्भात पात्रतेबद्दल कोणतीही शंका दूर करण्यासाठी, ईसीएलजीएस 3.0 अंतर्गत समाविष्ट असलेल्या क्षेत्रांबाबत त्यांच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या व्यवसायांची गणना करून स्पष्ट केले आहे (संलग्न यादी).
या सुधारणांचा उद्देश या संपर्क-केंद्रित क्षेत्रांमधील व्यवसायांना वाढीव व्याप्ती आणि मर्यादित व्याजदर / शुल्कावरील तरलतेच्या माध्यमातून अधिक मदत मिळविण्यासाठी सक्षम बनवणे हा आहे.
25.3.2022 पर्यंत, ईसीएलजीएसअंतर्गत मंजूर केलेल्या कर्जांनी 3.19 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि जारी केलेल्या हमीपैकी सुमारे 95% सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मंजूर केलेल्या कर्जासाठी आहेत.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1811700)
Visitor Counter : 303