संरक्षण मंत्रालय
जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या लष्करी आवृतीने प्रगती चाचण्या केल्या पूर्ण
ओदीशाच्या किनार्यावरून घेण्यात आलेल्या आणखी दोन यशस्वी प्रक्षेपण चाचण्यांसह परिणामकारकता सिद्ध
चाचण्या यशस्वी झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि भारतीय लष्कर आणि उद्योग क्षेत्राची केली प्रशंसा
Posted On:
30 MAR 2022 5:28PM by PIB Mumbai
ओदिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून 30 मार्च 2022 रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांदरम्यान पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र लष्कर शस्त्र प्रणालीने (एमआरएसएएम ) दोन क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून अती वेगवान हवाई लक्ष्यांवर थेट मारा करत पुन्हा आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे. बाह्य क्षेत्रामधून समुद्रावरून जाणाऱ्या आणि अधिक उंचीवरील लक्ष्याविरूद्ध शस्त्रास्त्र प्रणालीची अचूकता आणि विश्वासार्हता स्थापित करण्यासाठी हे प्रक्षेपण करण्यात आले. या चाचण्यांदरम्यान क्षेपणास्त्र, शस्त्र प्रणाली रडार आणि कमांड पोस्टसह सर्व शस्त्र प्रणाली घटकांची कामगिरी प्रमाणित करण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ ) आणि भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्षेपण चाचण्या घेण्यात आल्या.विविध पल्ल्याच्या आणि परिस्थितींसाठी प्रक्षेपण चाचण्यांच्या समाप्तीसह, या प्रणालीने विकास चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एमआरएसएएम-लष्कर आवृत्तीच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था , भारतीय लष्कर आणि उद्योग क्षेत्राची प्रशंसा केली आहे आणि यशस्वी प्रक्षेपणामुळे या प्रणालीची विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. .संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी शस्त्रास्त्र प्रणालीच्या यशस्वी चाचणीशी संबंधित चमूचे अभिनंदन केले.
27 मार्च, 2022 रोजी, थेट मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचा भाग म्हणून अतिवेगवान हवाई लक्ष्यांवर मारा करण्याची वेगवेगळ्या पल्ल्यांसाठी क्षेपणास्त्र प्रणालीची दोनदा यशस्वी चाचणी घेण्यात आली.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1811563)
Visitor Counter : 351