आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने एकूण 183.53 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 1.36 कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन मुलांचे लसीकरण

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 15,378 इतकी कमी झाली; देशातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ती 0.04% आहे.

गेल्या 24 तासात 1,259 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.25%

Posted On: 29 MAR 2022 9:46AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 183.53  (1,83,53,90,499) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,18,49,698 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत 1.36 (1,36,84,215) कोटींपेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लस मात्रा दिल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,03,540

2nd Dose

99,97,372

Precaution Dose

44,34,514

FLWs

1st Dose

1,84,12,938

2nd Dose

1,75,04,076

Precaution Dose

68,19,657

Age Group 12-14 years

1st Dose

1,36,84,215

Age Group 15-18 years

1st Dose

5,69,24,555

2nd Dose

3,74,81,738

Age Group 18-44 years

1st Dose

55,43,83,974

2nd Dose

46,42,96,274

Age Group 45-59 years

1st Dose

20,27,08,609

2nd Dose

18,49,49,757

Over 60 years

1st Dose

12,67,09,234

2nd Dose

11,52,04,183

Precaution Dose

1,14,75,863

Precaution Dose

2,27,30,034

Total

1,83,53,90,499

 

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने सध्या ती 15,378 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे.

गेल्या 24 तासांत 1,705 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,24,85,534 झाली आहे.

 

गेल्या 24 तासात 1,259 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासात एकूण 5,77,559  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 78.79  (78,79,32,913) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.25% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.22% आहे.

 

****

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1810784) Visitor Counter : 188