वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
हापूस आणि केशर आंब्याची हंगामातील पहिली खेप जपानला निर्यात
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त टोकियो, जपान येथे आंबा महोत्सवाचे आयोजन
Posted On:
28 MAR 2022 1:04PM by PIB Mumbai
मुंबई, 28 मार्च 2022
निर्यातीला चालना देत, कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) हंगामातील हापूस आणि केशर आंब्याची पहिली खेप शनिवार, 26 मार्च रोजी जपानला निर्यात केली. अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स बेरीडेल फूड्स (ओपीसी) प्रा.लि. यांनी जपनाच्या लॉसन रिटेल चेनकडे हापूस आणि केशर आंबा निर्यात केला. निर्यात केलेले आंबे अपेडा मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने (MSAMB) प्रक्रिया करून पॅकिंग केले आहेत.
टोकियो, जपान येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय दूतावास आणि इन्वेस्ट इंडिया यांनी आज, 28 मार्च रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
अपेडाने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून व्यापार मेळे (ट्रेड फेअर्स), शेतकऱ्यांसाठी पोर्टल, ई-ऑफिस, हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी सिस्टम, खरेदी-विक्री मेळावा, उत्पादन केंद्री मेळावे अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
****
S.Thakur/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810417)
Visitor Counter : 379