माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दुबई एक्स्पोमध्ये तेजस (TEJAS) कौशल्य प्रकल्पाचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आरंभ; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत गुंतवणुकीच्या संधींवर केली चर्चा
Posted On:
27 MAR 2022 9:38PM by PIB Mumbai
दुबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज तेजस (अमिरातीमधील रोजगार आणि कौशल्यांसाठी प्रशिक्षण) प्रकल्पाचा आरंभ केला. परदेशातील भारतीयांना प्रशिक्षित करण्यासाठी हा एक स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे. भारतीयांना कौशल्य प्रशिक्षण, प्रमाणीकरण आणि परदेशात नोकरी मिळवून देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील कौशल्य आणि बाजाराच्या गरजा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने भारतीय कामगारांना सक्षम बनवणे हे तेजस प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
भारत हा तरुणाईची लोकसंख्या असलेला देश आहे. देश उभारणी आणि प्रतिमा निर्मितीत तरुण हे सर्वात मोठे हितधारक आहेत,असे ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. या लोकसंख्येचा कौशल्य विकास आणि भारताकडून जगाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, असे ते म्हणाले. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील दृढ भागीदारीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाचा ठाकूर यांनी पुनरुच्चार केला.सुरुवातीच्या टप्प्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये 10,000 कुशल भारतीय मनुष्यबळ तयार करण्याचे तेजसचे उद्दिष्ट आहे.
अनुराग ठाकूर यांनी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील उद्योजकांशी चर्चाही केली.
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810311)
Visitor Counter : 333