वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
परशोत्तम रुपाला यांनी मूल्यवर्धित मांस उत्पादनांना चालना देण्यासाठी रोगमुक्त प्राणीक्षेत्र निर्माण करण्याचे केले आवाहन
मूल्यवर्धित मांस उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाने राष्ट्रीय व्यवसाय परिषदेचे केले आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये देशातील पशुधनांमधील लाळ्या-खुरकुत (फूट ॲंड माऊथ डिसीज,FMD) आणि ब्रुसेलोसिस या रोगांचे नियंत्रण आणि निर्मूलन करण्यासाठी 12,652 कोटी रुपयांच्या निधी आवंटीत करून राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाला केला होता आरंभ
Posted On:
27 MAR 2022 1:55PM by PIB Mumbai
मूल्यवर्धित मांस उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री परशोत्तम रुपाला यांनी हितसंबंधितांना देशात प्राणी रोगमुक्त विशिष्ट क्षेत्र निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्नशील रहाण्याचे आवाहन केले आहे.
25 मार्च, 2022 रोजी नवी दिल्ली येथे अपेडाने (APEDA) आयोजित केलेल्या मूल्यवर्धित मांस उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय व्यवसाय परिषदेचे उदघाटन करताना रुपाला म्हणाले की, कुक्कुट पक्ष्यांमध्ये रोगाचा एकाला जरी प्रादुर्भाव झाला तरी, संपूर्ण देशचा 'रोगग्रस्त' झाला आहे, असे मानले जाते.
सिक्कीमला सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आलेल्या प्रारुपाचा उल्लेख करत आणि त्यातील उत्पादने बाजारामध्ये गुणवत्तापूर्ण असल्याचे सांगून ते म्हणाले,“सर्व संबंधितांनी छोटी-छोटी पावले उचलली पाहिजेत आणि छोट्या प्रदेशांतून- एका वेळी काही जिल्हे रोगमुक्त घोषित करण्यासाठी काम केले पाहिजे,”
रुपाला पुढे म्हणाले,की पाळीव प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने भारत रोगमुक्त करण्यासाठी कृती करण्यायोग्य मुद्द्यांसह आराखडा तयार करण्यासाठी सर्व संबंधितांनी सर्वेक्षण सुरू करण्याची गरज आहे. “त्याचवेळी, दूषित क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि अलग ठेवण्यासाठी कृती आराखडा तयार केला पाहिजे, जसे आपण कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी केले आहे, असेही श्री रुपाला यांनी नमूद केले.
ते म्हणाले की,पाळीव प्राणी हे आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी जीवन आधार प्रणाली आहेत, ते कठीण काळात उदरनिर्वाह चालवून टिकून रहाण्यास मदत करतात आणि ग्रामीण लोकांसाठी पोषणासाठी, विशेषत: प्रथिनांचा एक मोठा स्रोत आहेत. जनावरांची उत्पादकता वाढवण्यासाठी काम करण्याची गरज आहे.
श्री रुपाला यांनी मूल्यवर्धित मांस उत्पादने आणि डुकराचे मांस उत्पादनांच्या निर्यातीबद्दल दोन नियमावली पत्रिकांचे देखील प्रकाशन केले.
पशुसंवर्धन मंत्रालय उत्पादकता आणि गुणवत्तेत वाढ सुनिश्चित करण्यासाठी पाळीव प्राण्यांचे आरोग्य, आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कार्य करत आहे, असे सांगत,ते असेही म्हणाले की, जगाने भारताने विक्रमी संख्येने कोविड-19 साठी लसीकरण केले हे पाहिले असून, सरकार सध्या पशुधनातील लाळ्या-खुरकुत (फूट ॲंड माऊथ रोग FMD) आणि ब्रुसेलोसिस निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवत आहे.
सप्टेंबर 2019 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पशुधनांमधील लाळ्या-खुरकुत (फूट ॲंड माऊथ रोग FMD) आणि ब्रुसेलोसिसचे नियंत्रण आणि निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केला होता. केंद्र सरकार पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत केंद्राने 12,652 कोटी रुपयांचा निधी आवंटीत केला आहे; ज्याचे उद्दिष्ट देशातील 600 दशलक्षाहून अधिक गुरांचे लसीकरण करणे हा आहे.
"शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात पशुसंवर्धनाची भूमिका महत्त्वाची आहे,"अशी माहिती अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम अंगमुथू यांनी या राष्ट्रीय परीषदेत आपल्या स्वागतपर भाषणात प्रतिनिधींना दिली. सेंद्रिय मध आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ साधताना भारत हा गोठवलेल्या आणि गोवंश मांसाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे," डॉ अंगमुथू म्हणाले.
***
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810194)