महिला आणि बालविकास मंत्रालय
वांशिक विविधतेविषयी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून विशेष चर्चासत्राचे आयोजन
Posted On:
26 MAR 2022 6:53PM by PIB Mumbai
राष्ट्रीय महिला आयोगाने आज नवी दिल्लीत, पोलीस संशोधन आणि विकास विभाग,राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि ईशान्य प्रदेशासाठीच्या विशेष पोलीस विभागासह, ‘वांशिक विविधतेविषयी जनजागृती’ या विषयावर एका विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. भारतातील विविध संस्कृतींची माहिती देण्यासाठी तसेच, देशातील विविध प्रथा-परंपरांविषयी परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली.
परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री, राजकुमार रंजन सिंह या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आजच्या या चर्चासत्राचा उद्देश, देशात राष्ट्रीय एकात्मतेची, एकतेची भावना निर्माण करणे हा असून अशा जनजागृती मोहिमेचा मुख्य हेतू असून, यामुळे आपल्या मनात एकमेकांविषयी आत्मियतेची भावना निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या ध्येयवाक्यावर भर दिला. भारतातील विविध संस्कृतीचे आदानप्रदान आणि त्याविषयी जनजागृती मोहीम होणे ही काळाची गरज आहे. परस्पर सामंजस्य आणि विश्वास हाच भारताच्या सामर्थ्याचा पाया आहे, त्यामुळे देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील व्यक्तीला सांस्कृतिक दृष्ट्या एकत्वभावना वाटायला हवी, असे रेखा शर्मा म्हणाल्या. पोलिसांची देखील या बाबत जनजागृती होणे आवश्यक आहे, असे सांगत, आयोगाद्वारे पोलिसांसाठी राबवल्या जाणाऱ्या जनजागृतीपर उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.
या चर्चासत्राचा उद्देश आपल्या देशाच्या विविधतेतील एकतेचा उत्सव साजरा करणे आणि देशातील लोकांमध्ये प्राचीन काळापासून असलेल्या भावनिक बंधांना अधिक दृढ करणे हा होता. समाजात, पहिल्या फळीत काम करणाऱ्या सर्वांना विविध वंश आणि संस्कृतीविषयी माहिती देणाऱ्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच दिल्लीत राहणाऱ्या विविध अल्पसंख्यक समुदायांच्या प्रतिनिधीना वांशिक भेदभावाचा सामना करावा लागल्यास, काय करता येईल यावर माहिती देण्यात आली.
या विषयावर विविध स्तरातील, व्यापक मते मांडण्यासाठी, आयोगाने, माजी फुटबॉल कॅप्टन बाईचुंग भूटिया, प्रयोगशील, सुधारणावादी शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक, पोलिस सह आयुक्त हिबू तमांग, इत्यादी मान्यवरांना आमंत्रित केले होते.
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810034)
Visitor Counter : 257