सांस्कृतिक मंत्रालय
महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन ईराणी यांच्या हस्ते दहा दिवसीय ‘लाल किल्ला उत्सव-भारत भाग्य विधाता’ चे उद्घाटन
लाल किल्ला उत्सव-भारत भाग्य विधाता महोत्सवामुळे वारसा संवर्धन आणि पर्यटनाला चालना
Posted On:
25 MAR 2022 7:12PM by PIB Mumbai
देशाची शान असलेल्या 17 व्या शतकातील लाल किल्यावर आजपासून “लाल किल्ला उत्सव- भारत भाग्य विधाता’ची सुरुवात झाली असून, 3 एप्रिल 2022 पर्यंत हा दहा दिवसांचा उत्सव चालणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन ईराणी यांच्या हस्ते, आज या महोत्सवाचे उद्घाटन झाले.
या उत्सवात, रासिकांना विविध कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. यात, ‘मातृभूमि- हा प्रोजेक्शन मॅपिंग शो, यात्रा- हा 360 अंशातील अनुभव देणारा कार्यक्रम, सांस्कृतिक पथसंचलन, खाऊ गल्ली, रंगमंचावरील लाईव्ह कार्यक्रम, नृत्ये, अनोखे वस्त्र, खेल मंच, खेळ गांव, योगा आणि अशी कितीतरी आकर्षणे या महोत्सवात आहेत. या सगळ्या कार्यक्रमात देशभरातील 70 कलाकारांनी भाग घेतला आहे.
या प्रसंगी स्मृती झुबिन ईराणी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवभारताच्या निर्मितीसाठी एकतर येण्याच्या आवाहनाचे स्मरण करून दिले. त्या म्हणाल्या लाल किल्ला केवळ एक वास्तू नाही, तर दर वर्षी राष्ट्राला त्याचे संकल्प, आश्वासनं आणि राज्यघटनेविषयी असलेल्या जबाबदारीची आठवण करून देणारे जिवंत प्रतीक आहे. या कार्यक्रमाद्वारे भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती एका छताखाली आली आहे, असे त्या म्हणाल्या. आपण येणाऱ्या पिढ्यांना, आपल्या समृद्ध इतिहासाबद्दल सांगायलाच हवे आणि भारताला जगात नव्या उंचीवर नेण्यासाठी त्याचे जतन करायला हवे, असे त्या म्हणाल्या.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालयाने लाल किल्ला महा-महोत्सव – भारत भाग्य विधाता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लाल किल्ला महोत्सव, भारताचा वारसा आणि भारताच्या प्रत्येक भागाची संस्कृती याचे स्मरण करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. भारत भाग्य विधाता महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाला भारताच्या विविधते विषयी मोलाची माहिती मिळेल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1809804)
Visitor Counter : 204