दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी प्रकल्प(CEIR) अंतर्गत फोन ट्रेसिंग

Posted On: 25 MAR 2022 3:48PM by PIB Mumbai

 

हरवलेला आणि चोरीला गेलेला मोबाइल फोन ब्लॉक करणे आणि शोधणे सुलभ करण्यासाठी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) प्रकल्प दिल्ली, मुंबई आणि महाराष्ट्र परवानाकृत सेवा क्षेत्रांमध्ये (LSAs) टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला आहे. CEIR प्रणालीच्या अहवालानुसार, दिल्ली, मुंबई आणि महाराष्ट्र परवानाकृत सेवा क्षेत्रांसाठी अनुक्रमे 169667, 8315 आणि 11848 इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) 20.03.2022 पर्यंत ब्लॉक करण्याची विनंती प्राप्त झाली आहे. हँडसेट पुनर्प्राप्त करण्यासाठी 110239, 4586 आणि 8317 IMEI चा ट्रेसेबिलिटी डेटा अनुक्रमे दिल्ली, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(b) आणि (c) CEIR ही एक बहु-भागधारक प्रणाली आहे जिथे दूरसंचार विभाग, दूरसंचार सेवा प्रदाते, पोलीस, मोबाईल फोन उत्पादक आणि मोबाईल फोन ग्राहकांसह संबंधित हितधारकांना त्यांच्या परिभाषित भूमिका आणि जबाबदाऱ्यांनुसार मर्यादित प्रवेश असतो. सध्या, यामध्ये ग्राहकाला त्याच्या/तिच्या मोबाइल हँडसेटच्या IMEI शी संबंधित मेक आणि मॉडेलची माहिती, मोबाइल फोनच्या आयातीदरम्यान IMEI च्या वास्तविकतेबद्दल मोबाइल फोन उत्पादकांना माहिती इ. चा समावेश आहे.

दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1809630) Visitor Counter : 300


Read this release in: Gujarati , English , Urdu , Bengali