आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 182 कोटी 55 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष वयोगटातील किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 90 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्येत घसरण होऊन आज देशात केवळ 21,530 रुग्ण कोविड सक्रीय; ही रुग्णसंख्या भारतातील एकूण कोविड बाधितांच्या केवळ 0.05%

गेल्या 24 तासांत देशात 1,685 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.75%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.33% आहे

Posted On: 25 MAR 2022 9:27AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 182 कोटी 55 लाखांचा (1,82,55,75,126) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,16,22,613 सत्रांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.


देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 90 लाखांहून अधिक(90,06,782) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.


आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या गटनिहाय विभागणीत खालील मात्रांचा समावेश आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403330

2nd Dose

9994485

Precaution Dose

4398383

FLWs

1st Dose

18412557

2nd Dose

17496759

Precaution Dose

6745780

Age Group 12-14 years

1st Dose

9006782

Age Group 15-18 years

1st Dose

56607372

2nd Dose

36629914

Age Group 18-44 years

1st Dose

554099674

2nd Dose

462064493

Age Group 45-59 years

1st Dose

202659572

2nd Dose

184401346

Over 60 years

1st Dose

126675891

2nd Dose

114860363

Precaution Dose

11118425

Precaution Dose

2,22,62,588

Total

1,82,55,75,126

 


देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन 21,530 झाली आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या केवळ 0.05%  आहे.



परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.75% आहे. गेल्या 24 तासांत 2,499 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,78,087 झाली आहे.



गेल्या 24 तासांत, देशात 1,685 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.



गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 6,91,425 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78 कोटी 56 लाखांहून अधिक (78,56,44,225) चाचण्या करण्यात आल्या आहेत.


 


देशातील साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.33% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील  0.24%.इतका नोंदला गेला आहे.

 


***

 

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1809500) Visitor Counter : 252