शिक्षण मंत्रालय
'परीक्षा पे चर्चा' या पंतप्रधानांच्या संवाद कार्यक्रमाच्या पाचव्या आवृत्तीेचे 1 एप्रिल 2022 रोजी होणार आयोजन
पंतप्रधान जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार
सर्जनशील लेखन स्पर्धेसाठी सुमारे 15.7 लाख विद्यार्थ्यांनीं नोंदणी केली
Posted On:
24 MAR 2022 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या पाचव्या आवृत्तीत 1 एप्रिल 2022 रोजी जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. सर्जनशील लेखन स्पर्धेसाठी सुमारे 15.7 लाख विद्यार्थ्यांनीं उत्साहाने नोंदणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या अनोख्या संवादात्मक कार्यक्रमाची संकल्पना मांडली होती. ज्यामध्ये देशभरातील आणि परदेशातील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्यांच्याशी संवाद साधून परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठी आणि आयुष्य उत्सवासारखे साजरे करण्याबाबत चर्चा करतील.
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे गेल्या चार वर्षांपासून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे. परीक्षा पे चर्चा च्या पहिल्या तीन आवृत्त्या नवी दिल्ली येथे टाऊन-हॉलमध्ये प्रत्यक्ष संवादाच्या स्वरूपात आयोजित करण्यात आल्या होत्या. चौथ्या आवृत्तीचे आयोजन 7 एप्रिल , 2021रोजी ऑनलाइन पद्धतीने झाले होते.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1809395)
Visitor Counter : 202