कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
बाल संगोपनासाठीची रजा
Posted On:
23 MAR 2022 2:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2022
नागरी सेवांमध्ये तसेच देशांतर्गत व्यवहारांशी संबंधित नेमणुका झालेल्या महिला सरकारी कर्मचारी केंद्रीय नागरी सेवा (रजाविषयक) नियम, 1972 मधील नियम क्र.43-सी अंतर्गत खालीलप्रमाणे बाल संगोपनासाठीची रजा मिळण्यास पात्र आहेत:
- 18 वर्षांपर्यंतच्या वयाच्या पहिल्या दोन जीवित मुलांच्या संगोपनासाठी संपूर्ण सेवाकाळात जास्तीतजास्त 730 दिवसांपर्यंतच्या कालावधीची रजा मंजूर होऊ शकेल.
- दिव्यांग मुलांच्या संगोपन रजेसाठी मुलांच्या वयाची मर्यादा असणार नाही.
- एका वर्षात तीनपेक्षा अधिक वेळा रजा घेता येणार नाही.
- एकल महिला सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत, एका वर्षात तीनऐवजी सहा वेळा बालसंगोपन रजा मंजूर होऊ शकेल.
नियम 43-सी(3) नुसार, सामान्यतः कोणत्याही सरकारी महिला कर्मचाऱ्याला उमेदवारीच्या कालावधीत बालसंगोपन रजा दिली जाणार नाही, मात्र काही विशिष्ट परिस्थितीच्या वेळी, रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्या उमेदवार महिलेला बाल संगोपन रजा घेण्याची खरोखरीच गरज आहे याबाबत खात्री पटली तरच ही रजा मंजूर केली जाईल, मात्र मंजूर रजेचा कालावधी किमान असेल.
केंद्रीय नागरी सेवा (रजाविषयक) नियम, 1972 मधील नियम क्र.43-सी नुसार, महिला कर्मचाऱ्याला तिचा हक्क म्हणून बाल संगोपनासाठीच्या रजेची मागणी करता येणार नाही तसेच कोणत्याही परिस्थितीत पूर्व मंजुरीशिवाय महिला कर्मचाऱ्याला बाल संगोपन रजेवर जाता येणार नाही.
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808635)
Visitor Counter : 1936