आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने आतापर्यंत पार केला 181.89 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 52 लाखापेक्षा जास्त किशोरवयीन मुलांचे लसीकरण

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 23,087 इतकी कमी झाली; भारताच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ती 0.05%

गेल्या 24 तासात देशभरात 1,778 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.36%

Posted On: 23 MAR 2022 9:34AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 181.89 (1,81,89,15,234) कोटी लसींच्या मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,14,87,809 सत्रातून हे लसीकरण करण्यात आले आहे.

 12 ते 14 वयोगटासाठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत 52 लाखापेक्षा जास्त (52,10,775) किशोरवयीन मुलांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403185

2nd Dose

9992561

Precaution Dose

4379371

FLWs

1st Dose

18412362

2nd Dose

17492689

Precaution Dose

6703788

Age Group 12-14 years

1st Dose

5210775

Age Group 15-18 years

1st Dose

56396784

2nd Dose

36118886

Age Group 18-44 years

1st Dose

553950209

2nd Dose

460840292

Age Group 45-59 years

1st Dose

202637680

2nd Dose

184111064

Over 60 years

1st Dose

126660199

2nd Dose

114677771

Precaution Dose

10927618

Precaution Dose

2,20,10,777

Total

1,81,89,15,234

 

देशात कोविड रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. सध्या ती 23,087 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.05% इतकी आहे.

 

देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे.

 

गेल्या 24 तासांत 2,542 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) 4,24,73,057 झाली आहे.

 

गेल्या 24 तासात देशभरात 1,778 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 6,77,218 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 78.42 (78,42,90,846) कोटींहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही सातत्याने घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.36% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.26% आहे.

***

ST/VJ/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1808572) Visitor Counter : 182