PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 21 MAR 2022 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 21 मार्च 2022

  • 181.24 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 25,106
  • Active cases stand at 0.06%
  • Recovery Rate currently at 98.74%
  • 2,652 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to
  • 4,24,67,774
  • 1,549 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.40%)
  • Weekly Positivity Rate (0.40%)
  • 78.30 cr Total Tests conducted so far; 3,84,499 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

राष्ट्रव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत लसीच्या आतापर्यंत 181.24 कोटीपेक्षा जास्त (1,81,24,97,303) मात्रा देण्यात आल्या. सकाळी 7 वाजेपर्यंत हाती आलेल्या तात्पुरत्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 2,14,03,116 सत्राद्वारे हे लसीकरण करण्यात आले आहे.

12-14 वर्षे वयोगटातल्या किशोरांसाठी 16 मार्च 2022 ला लसीकरण सुरु झाले. गेल्या 24 तासात सुमारे 18 लाख (17,99,684) किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली.

भारतात उपचाराधीन रुग्णसंख्येचा घटता कल कायम राखत या संख्येत आणखी घट होऊन ती आज 25,106 झाली आहे. देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या ती 0.06% आहे.

परिणामी रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर 98.74% झाला आहे. गेल्या 24 तासात 2652 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत (देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून) कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,67,774 झाली आहे.

गेल्या 24 तासात देशात 1,549 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात 3,84,499 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78.30  कोटीहून अधिक (78,30,45,157) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात दैनंदिन आणि साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सातत्याने घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 0.40% आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.40% आहे.

इतर अपडेट्स :

 

 

S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1807930) Visitor Counter : 145


Read this release in: English , Hindi , Manipuri , Gujarati