नागरी उड्डाण मंत्रालय
विमानतळावर संरक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
Posted On:
21 MAR 2022 7:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2022
संरक्षणाची गरज सातत्याने बदलत असते. नागरी हवाई वाहतूक सुरक्षा विभाग(बीसीएएस) ही देशातील हवाई वाहतुकीशी संबंधित नियामक संस्था आहे. ही संस्था इतर संबंधित संस्थांच्या सहयोगाने आणि संबंधितांच्या सूचनां लक्षात घेऊन विमानतळावरील संरक्षण व्यवस्थेचा आढावा घेते आणि गरजेनुसार ती व्यवस्था अद्ययावत करते.
विमानतळावरील संरक्षण व्यवस्थेसाठी पुढील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते किंवा वापरण्याची सूचना केली गेली आहे.
1 केंद्रीय प्रवेश नियंत्रण प्रणाली : धावपट्टी, विमानतळाची लॉबी आणि प्रवेशद्वार येथे विमानतळावरील कर्मचारी /कामगार तसेच विमानतळावरील वाहने यांच्या विमानतळावरील प्रवेशासाठी बायोमेट्रिक आधारित स्मार्ट कार्ड वितरित केली आहेत तसेच रेडिओ फ्रिक्वेन्सी वर आधारित स्वयंचलित वाहन नियंत्रण प्रणाली आहे.
2 विमानतळावर टप्प्याटप्प्याने बॉडी स्कॅनर .
3 डीजी यात्रा- अनेक ठिकाणी तिकीट किंवा आयडी तपासण्याची गरज भासू न देणाऱ्या डीजी यात्रा धोरणाला नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून प्रारंभ.
4 रेडिओलॉजिकल डिटेक्शन इक्विपमेंट : भारतीय विमानतळांच्या कार्यान्वयनात किरणोत्सर्ग विषयक आणीबाणीची परिस्थिती रोखण्यासाठी बीसीएएस ने AVSEC सर्क्युलर नंबर 1/2020 नुसार मानक प्रणाली अमलात आणली आहे.
5 काउंटर ड्रोन किंवा दूरनियंत्रित हवाई वाहन सिस्टीम: यासंदर्भात नुकत्याच जारी झालेल्या बीसीएएस च्या परिपत्रकानुसार स्वयंचलित हवाई वाहनाचा शोध आणि ते निकामी करण्यासंदर्भात नियम लागू केले आहेत.
हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल(निवृत्त) व्ही. के सिंह यांनी राज्यसभेत आज एका उत्तरात ही माहिती दिली.
S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807814)