खाण मंत्रालय
खाण क्षेत्रातील वाढ भारतीय अर्थव्यवस्थेला योग्य चालना देते- प्रल्हाद जोशी
प्रविष्टि तिथि:
20 MAR 2022 7:21PM by PIB Mumbai
गेल्या काही वर्षांमध्ये खाण क्षेत्राखालील भारताचे एकूण भौगोलिक क्षेत्र लक्षणीयरीत्या वाढले आहे आणि हे क्षेत्र प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे देशभरातील 12 दशलक्ष लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे; असे केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले. त्यांनी आज आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक परिषदेच्या 36 व्या उद्घाटन सत्राला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.

जोशी पुढे म्हणाले, की सध्याच्या सरकारच्या काळात खनिज उत्खननाची गती अनेक पटींनी वाढली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला सुयोग्य भर देणार्या खाण क्षेत्रात झालेल्या अलीकडच्या सुधारणा अधोरेखित करत जोशी यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (GSI) उत्कृष्टतेचे अधिक आयाम गाठण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या उल्लेखनीय प्रगतीची प्रशंसा केली.36 व्या आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक परिषदेचे महत्त्व विशद करताना जोशी यांनी विश्वास व्यक्त केला की, भारताने 58 वर्षांनंतर आयोजित केलेला हा तीन दिवसीय कार्यक्रम, शाश्वत विकासाच्या क्षेत्रात अधिक प्रभावी साधने तयार करण्यासाठी जगभरातील भूवैज्ञानिकांना योग्य व्यासपीठ प्रदान करेल.
***
S.Kane/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1807452)
आगंतुक पटल : 282