पोलाद मंत्रालय
ड्रोन-आधारित खनिज उत्खननासाठी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लि. (NMDC) चा आयआयटी खरगपूरसोबत सामंजस्य करार
Posted On:
19 MAR 2022 11:39AM by PIB Mumbai
पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या देशातील सर्वात मोठ्या खनिज उत्पादक कंपनीने (NMDC), ड्रोन-आधारित खनिज उत्खननासाठी आयआयटी खरगपूर सोबत बुधवारी एक सामंजस्य करार केला. तांबे, रॉक फॉस्फेट, चुनखडी, मॅग्नेसाइट, डायमंड, टंगस्टन आणि वाळू यासारख्या खनिजांच्या G4 श्रेणीपासून ते यूएनएफसीच्या G1 अशा विस्तृत श्रेणीसाठी एनएमडीसी गेल्या सहा दशकांपासून खनिजांचा शोध घेत आहे.
एनएमडीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुमित देब, यावेळी म्हणाले, “देशातील खनिज उत्खननासाठी ड्रोन-आधारित जिओफिजिकल सर्वेक्षण आणि हायपरस्पेक्ट्रल अभ्यास करणारी एनएमडीसी ही भारतातील पहिली सीपीएसई(CPSE) असेल. एनएमडीसीने आयआयटी -खरगपूर सोबत केलेला करार एक नवीन अध्याय सुरू करेल आणि देशातील खनिज उत्खननाच्या क्षेत्रात एक मानदंड प्रस्थापित करेल.
ड्रोन्ससंदर्भातील धोरण निश्चित केल्यामुळे, सरकारने भारतातील ड्रोन वापर आणि परिचालनाचे नियमन आणि निरीक्षण करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे जे सध्या कृषी, शहरी नियोजन, वनीकरण, खाणकाम, आपत्ती व्यवस्थापन, पाळत ठेवणे, वाहतूक या क्षेत्रात वापरले जात आहेत.
एनएमडीसी आणि आयआयटी खरगपूर खाणकामासाठी ड्रोन तंत्रज्ञान(UAV) वापरून शोधासाठी स्पेक्ट्रल उत्पादने, पद्धती आणि अल्गोरिदम विकसित करतील. एनएमडीसी आणि आयआयटी खरगपूर यांच्यातील सहकार्यामुळे खनिज उत्खनन आणि खाण तंत्रज्ञानावरील क्षमता निर्माण कार्यक्रमांसाठी सॉफ्टवेअर स्पेक्ट्रल टूल्सचा विकास होईल.
***
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807250)
Visitor Counter : 254