राष्ट्रपती कार्यालय

होळीच्या पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 17 MAR 2022 8:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मार्च 2022

राष्ट्रपती  राम नाथ कोविंद यांनी होळीच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

होळीच्या शुभमुहूर्तावर, मी सर्व देशवासियांना आणि परदेशातील भारतीय बांधवांना शुभेच्छा देतो,"असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

होळी म्हणजे रंगांचा हा सण वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देत, आपल्या जीवनात आनंद आणि उत्साह घेऊन येतो.  हा सण सामाजिक सलोख्याचे आणि एकोप्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे.  सर्व वयोगटातील आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेली  मुले, तरुण, स्त्री-पुरुष हा सण उत्साहात साजरा करतात.

रंगांचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल आणि राष्ट्र उभारणीच्या भावनेला  सामर्थ्य देईल अशी भावना मी व्यक्त करतो.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1807051) Visitor Counter : 150