संरक्षण मंत्रालय
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने,बेंगळुरूमध्ये विक्रमी 45 दिवसांत इन-हाऊस हायब्रीड तंत्रज्ञान वापरून बांधलेल्या विमानोड्डाण नियंत्रण एकात्मिकरण संकुलाचे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
प्रगत मध्यम लढाऊ विमानांच्या विकास आणि संशोधन उपक्रमांसाठी इमारतीचा होणार वापर
Posted On:
17 MAR 2022 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मार्च 2022
संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी आज दिनांक 17 मार्च 2022 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (DRDO) प्रयोगशाळा असलेल्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE) येथील सात मजली फ्लाइट कंट्रोल सिस्टम इंटिग्रेशन (FCS) संकुलाचे उद्घाटन केले. पारंपरिक, प्री-इंजिनियर आणि प्रीकास्ट पद्धतीचा समावेश असलेले हे इमारत संकुल, इन-हाऊस हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करून विक्रमी 45 दिवसांत बांधण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने मेसर्स लार्सन आणि टुब्रो (M/s Larsen & Toubro,L&T) यांच्या सहाय्याने विकसित केले आहे. आयआयटी मद्रास आणि आयआयटी रुरकी यांच्या संघांनी यासाठी संरचना तपासणी आणि तांत्रिक सहाय्य प्रदान केले आहे.
एडीई, बेंगळुरूने हाती घेतलेल्या प्रगत मध्यम लढाऊ विमानांसाठी एव्हीओनिक्स आणि उड्डाणे नियंत्रण प्रणाली विकसित करण्यासाठी,ही उड्डाण नियंत्रण प्रणाली सुविधा संशोधन आणि विकास संस्थेच्या (R&D) उपक्रमांना समर्थन देईल. संरक्षण मंत्री म्हणाले की, हा केवळ देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील एक अद्वितीय प्रकल्प आहे आणि नवीन भारताच्या नवीन उर्जेचे हे मूर्त स्वरूप आहे.
“ही ऊर्जा म्हणजे तंत्रज्ञानाशी आणि, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रातील संस्थात्मक सहकार्याशी असलेली वचनबद्धता आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'आत्मनिर्भर भारत' ची आहे,” असा विश्वास व्यक्त करत ते पुढे म्हणाले, "ही सुविधा राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यासाठी, सहाय्यक ठरेल.या संकुलात लढाऊ विमानांच्या वैमानिकांना सिम्युलेटर प्रशिक्षण देखील प्रदान करता येईल. हा सिम्युलेटर प्रशिक्षण विभाग संकुलाच्या सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक आहे, असे श्री राजनाथ सिंह यांनी त्याचे वर्णन केले. सिम्युलेटर्स कोणत्याही प्रकारची हानी होऊ न देता चुका करून शिकण्याची संधी उपलब्ध करतात असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807007)
Visitor Counter : 276