उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्याकडून देशातल्या जनतेला होळीनिमित्त शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 17 MAR 2022 11:52AM by PIB Mumbai

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

रंगाचा सण असलेल्या होळीच्या पवित्र प्रसंगी देशातल्या जनतेला शुभेच्छा. देशभरात पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण म्हणजे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने एकत्र येऊन उत्साह आणि आनंदाने साजरा करण्याचा सण असल्याचे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. होलिका दहन म्हणजे दुष्ट प्रवृत्तीवर सुष्टाच्या विजयाचे प्रतिक आहे.

होळीच्या या पवित्र सणानिमित्त आपल्या समाजाला एकत्र आणणाऱ्या मैत्री आणि सलोख्याचे बंध अधिक दृढ करूया. हा सण आपल्या जीवनात शांतता, सलोखा, प्रगती आणि आनंदाची उधळण करणारा ठरावा अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.     

***

ST/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1806895) आगंतुक पटल : 244
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Malayalam