गृह मंत्रालय

12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण आणि साठ वर्षे वयावरील सर्व नागरिकांना खबरदारीच्या लसमात्रा देण्यास प्रारंभ केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

Posted On: 16 MAR 2022 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मार्च 2022

12 ते 14 वयोगटातील बालकांसाठी लसीकरण आणि साठ वर्षांहून जास्त वय असलेल्या सर्व नागरिकांसाठी लसमात्रा यांचा आरंभ केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अभिनंदन केले आहे.

"प्रत्येक भारतीय नागरिकाची सुरक्षितता आणि आरोग्य यासाठी वचनबद्ध असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाला विनामूल्य लस या मोहिमेअंतर्गत आज पासून 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू झाले आहे तसेच साठ वर्षे वयांहून जास्त वय असलेल्या नागरिकांना देखील खबरदारीची लसमात्रा दिली जात आहे. या वयोगटातील प्रत्येकाचे लसीकरण झाले पाहिजे", असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

"एकशे तीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कोविड-19 च्या लसीकरण मोहीमेला एवढा वेग आणणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि नेतृत्वाविना शक्य झाले नसते. त्यांच्या दूरदर्शीपणातूनच हे प्रत्यक्षात येऊ शकले", असेही शाह यांनी म्हटले आहे

" मोदी यांचे मी यासाठी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे ही मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना मी अभिवादन करतो" असेही शाह यांनी म्हटले आहे.

 

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1806729) Visitor Counter : 199


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri