सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हाताने मैला सफाईचे काम करण्यामुळे मृत्यू

Posted On: 16 MAR 2022 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मार्च 2022

मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग संदर्भात (मानवी मलमूत्र हाताने साफ करणे) राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळाने कोणतेही सर्वेक्षण केले नाही कारण एमएस, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग कायदा, 2013 च्या कलम 5 अंतर्गत परिभाषित केल्यानुसार मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मुळे मृत्यू झाल्याची कोणतीही नोंद नाही.

तामिळनाडूमध्ये हाताने मैलासफाई केल्यामुळे एकही मृत्यू झालेला नाही.  तथापि, मैला वाहून नेणाऱ्या वाहिन्या आणि सेप्टिक टाक्यांची  धोकादायक पद्धतीने साफसफाई केल्यामुळे आणि "मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स म्हणून कामाला ठेवण्यास प्रतिबंध आणि त्यांचे पुनर्वसन नियम, 2013" अंतर्गत विहित केलेल्या सुरक्षा खबरदारीचे पालन न केल्यामुळे 43 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मॅन्युअल स्कॅव्हेंजर्सच्या पुनर्वसनासाठी सरकार केंद्रीय क्षेत्रातील स्वयंरोजगार योजना (SRMS) राबवत आहे. त्यात हाताने मैलासफाई करणाऱ्या कामगारांचे पुनर्वसन करायला सहाय्यभूत अशा खालील तरतुदी केलेल्या आहेत:-

  1. कुटुंबातील एका मॅन्युअल स्कॅव्हेंजरला रु.  40,000/ चे एकाच वेळी दिले जाणारे अर्थसहाय्य
  2. मॅन्युअल स्कॅव्हेंजर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना  दोन वर्षांपर्यंत @3,000/-रुपये  प्रति महिना विद्यावेतनासह कौशल्य विकास प्रशिक्षण
  3. ज्यांनी स्वच्छताविषयक प्रकल्पांसह स्वयंरोजगार प्रकल्पांसाठी कर्ज घेतले आहे त्यांच्यासाठी 5.00 लाख रुपयांपर्यंत भांडवली अनुदान
  4. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) या अंतर्गत हाताने मैलासफाई करणाऱ्या सर्व कामगारांच्या कुटुंबांसाठी आरोग्य विमा.

या योजनेंतर्गत मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना गेल्या पाच वर्षांत दिलेल्या मदतीची व्याप्ती पुढीलप्रमाणे आहे:-

 (No. of beneficiaries covered)

Year

One time cash Assistance

Skill Development Training

Capital Subsidy

2016-17

1357

4273

196

2017-18

1171

334

159

2018-19

18079

1682

144

2019-20

13246

2532

107

2020-21

14692

6204

157

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

  

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1806596) Visitor Counter : 303