ग्रामीण विकास मंत्रालय
देशभरात सुमारे 5000 महिलांनी केली कुपोषणाबाबत जनजागृती
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानाअंतर्गत,100 हून अधिक ‘कुपोषण से आझादी रॅली’ मध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या महिला प्रशिक्षणार्थीनी घेतला सहभाग
Posted On:
12 MAR 2022 3:24PM by PIB Mumbai
ग्रामीण भागातील महिलांमध्ये कुपोषण, रक्तक्षय आणि जन्मतःच कमी वजन असलेल्या बालकांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (डीडीयू -जीकेवाय) आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरएसईटीआय) या दोन्हींमधील 5000 हून अधिक प्रशिक्षणार्थींनी देशभरात 100 हून अधिक रॅली काढल्या. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानाअंतर्गत ग्रामविकास मंत्रालय साजरा करत असलेल्या 'आयकॉनिक वीक' चा एक भाग म्हणून ‘कुपोषण से आझादी’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
Assam
ग्रामीण महिलांमध्ये पोषणाचे महत्त्व अधिक अधोरेखित करण्यासाठी, राज्य ग्रामीण उपजीविका अभियान, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, प्रकल्प अंमलबजावणी संस्था (पीआयए), कार्यक्रम लाभार्थी इत्यादी विविध संबंधितांनी रॅली काढली.या रॅलीचा एक भाग म्हणून महिला प्रशिक्षणार्थींनी माहितीपूर्ण फलक आणि पोस्टर्स घेऊन गावोगावी पदयात्रा आणि सायकल यात्रा काढल्या.
Andhra Pradesh
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ((डीडीयू - जीकेवाय) ही 25 सप्टेंबर, 2014 रोजी सुरू करण्यात आली, भारत सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयाद्वारे निधी पुरवठा केला जाणारा हा देशव्यापी रोजगार-संलग्न कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आहे. ग्रामीण भागातील गरीब तरुणांमध्ये रोजगाराशी संबंधित कौशल्ये विकसित करण्याचा आणि त्यांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये वेतन रोजगार देण्याचा दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा प्रयत्न आहे. किमान 70% प्रशिक्षित उमेदवारांना रोजगाराची हमी देणारी आणि किमान अनिवार्यता प्रमाणपत्र देण्यासाठीची रचना या कार्यक्रमात आहे.
RSETI Pakur
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना कार्यक्रम 27 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोजगारावर भर देऊन ग्रामीण भागातील गरीब तरुणांसाठी राबवण्यात येत आहे. 871 हून अधिक प्रकल्प अंमलबजावणी संस्थांच्या माध्यमातून 2381 हून अधिक प्रशिक्षण केंद्रांद्वारे ग्रामीण भागातील गरीब तरुणांना सुमारे 611 विविध रोजगारांच्या प्रकारांशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते.या कार्यक्रमाअंतर्गत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण 11.52 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि 7.15 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Cycle rally at village Puruwala, Sirmaur district
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून (59 राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (एनएसस्क्यूएफ)द्वारे रचना केलेल्या आणि ग्रामविकास मंत्रालयाकडून मंजूर 5) 64 अभ्यासक्रमांमध्ये 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण 40.3 लाख उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि 28.39 लाख प्रशिक्षणार्थींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Cycle rally organised by RSETI Dhenkanal
हा कार्यक्रम सध्या 23 आघाडीच्या बँकांनी (सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र तसेच काही ग्रामीण बँका) प्रायोजित केलेल्या 585 कार्यरत ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून 28 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येत आहे.
Cycle rally by RSETI Khammam
***
R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805328)
Visitor Counter : 356