मंत्रिमंडळ
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजेस , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्यात स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
09 MAR 2022 4:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)आणि अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजेस , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्यात सप्टेंबर 2021 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराबाबत माहिती देण्यात आली.
सामंजस्य कराराची उद्दिष्टे:
चेन्नई येथील आयसीएमआरच्या राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था (NIRT) येथे मूलभूत, अनुवादात्मक आणि उपयोजित नाविन्यपूर्ण संशोधन, महामारीविज्ञान, औषध, अणु जीवशास्त्र, वैद्यकीय कीटकशास्त्र, रोगप्रतिकारशास्त्र, औषध, सूक्ष्मजीवशास्त्र आणि विषाणूशास्त्र पुरते मर्यादित न राहता उष्णकटिबंधीय संसर्गजन्य आणि ऍलर्जीक रोगांच्या प्रतिबंध, निदान आणि उपचारांच्या तंत्रांवर लक्ष केंद्रित करून सहकार्य केले जाईल.
क्षयरोग, परजीवी संसर्ग, एचआयव्ही/एड्स, ऍलर्जीक रोग, इतर उदयोन्मुख आणि पुन्हा उद्भवणारे आजार आणि अन्य रोगांसाठीच्या सहकार्याचा यात समावेश आहे.
आर्थिक भार :-
अमेरिका आणि भारत सरकार संसाधनांच्या उपलब्धतेनुसार या सामंजस्य करार अंतर्गत वित्तीय सहाय्य पुरवू शकतात. वैयक्तिक प्रकल्पांना मदत देण्यासाठी उभय देश सरकारी, बिगर -सरकारी, खाजगी क्षेत्र, फाउंडेशन आणि इतर स्त्रोतांकडून आवश्यक आणि नेहमीच्या आणि प्रचलित पद्धतीनुसार,अतिरिक्त निधी आणि सक्रिय सहभाग मिळवू शकतात,
रोजगार निर्मिती :-
भारतीय शास्त्रज्ञ/संशोधक/विद्यार्थ्यांना, नियमांनुसार, आयसीईआर कार्यक्रमातून निर्माण होणाऱ्या सहकार्यात्मक संशोधन प्रकल्पांतर्गत कंत्राटी/प्रकल्प म्हणून नियुक्त केल्यामुळे त्यांना क्षयरोग आणि इतर क्षेत्रातील विविध तंत्रे/कौशल्य विकास शिकण्यात आणि क्षमता निर्माण करण्यास मदत मिळेल.
पार्श्वभूमी :-
चेन्नईमध्ये इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन रिसर्च (ICER) च्या स्थापनेसाठी 2003 मध्ये भारत-अमेरिका संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्याला 2008 मध्ये मुदतवाढ देण्यात आली आणि 2017 मध्ये पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. आता सामंजस्य करार म्हणून नूतनीकरण करण्यात आले. इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन रिसर्च ICER चेन्नई येथे आहे आणि NIAID आणि ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन ट्युबरक्युलोसिस (NIRT) यांच्यातील भागीदारी आहे.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804400)
Visitor Counter : 286
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam