पोलाद मंत्रालय
विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सेलच्या कर्मचाऱ्यांची चमकदार कामगिरी
प्रविष्टि तिथि:
09 MAR 2022 2:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2022
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (सेल) च्या कर्मचार्यांनी 2018 या वर्षासाठी दिल्या गेलेल्या विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार (VRP) समारंभात प्रभावी कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार, पर्यावरण, वन आणि हवामान बदल, मंत्री श्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे हर पुरस्कार प्रदान केले. यावेळी कामगार आणि रोजगार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री श्री रामेश्वर तेली हे देखील उपस्थित होते. भारत सरकारने सुरू केलेल्या विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्काराचे (VRP) उद्दिष्ट राष्ट्रीय स्तरावर औद्योगिक उपक्रमांमधील कामगारांच्या प्रयत्नांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे हा आहे. एकूण 96 पुरस्कार विजेत्यांपैकी 52 पुरस्कार विजेते सेलचे आहेत, एकूण विजेत्यांपैकी 54% पुरस्कारांचे ते प्रतिनिधित्व करतात. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (सेल) च्या कर्मचाऱ्यांनी वर्ष 2018 साठी दिलेल्या एकूण 28 पुरस्कारांपैकी 11 पुरस्कार जिंकले आहेत, जे विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कारांच्या (VRP) च विविध श्रेणींमधील एकूण पुरस्कारांच्या 39% आहेत.

दुसऱ्या एका कार्यक्रमात सेलच्या अध्यक्षा श्रीमती. सोमा मंडल यांनी व्हीआरपी विजेत्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
ST/SP/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1804341)
आगंतुक पटल : 236