नागरी उड्डाण मंत्रालय
भारतातून आणि भारतात येणाऱ्या विमानांची आंतरराष्ट्रीय व्यावसायिक हवाई वाहतूक सेवा 27 मार्च 2022 पासून पूर्ववत सुरु होणार
प्रविष्टि तिथि:
08 MAR 2022 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2022
कोविड-19 च्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्रीय हवाई वाहतूक महासंचालनालयाने 19 मार्च 2020 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, 23 मार्च 2020 पासून, भारतात येणाऱ्या आणि भारतातून परदेशी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमानांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले होते. सध्या, डीजीसीएच्या, 28 फेब्रुवारी 2022 च्या परिपत्रकानुसार, भारतातून होणाऱ्या आणि भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या प्रवासावरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहतील, असे म्हटले होते.
जगभरात व्यापक प्रमाणात झालेले कोविड प्रतिबंधक लसीकरण लक्षात घेऊन आणि त्यानंतर सर्व हितसंबंधियाशी चर्चा केल्यावर केंद्र सरकारने भारतातून येणाऱ्या आणि भारतात जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय नागरी हवाई व्यावसायिक विमानसेवा येत्या 27 मार्च 2022 पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या घालण्यात आलेले निर्बंध 26 मार्च 2022 च्या रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत लागू असतील तसेच, एअर बबल व्यवस्था देखील तोपर्यंत लागू असेल.
आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक करतांना आरोग्य मंत्रालयाने दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर केलेल्या नियमांचे संपूर्ण पालन करूनच केला जावा, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
* * *
R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1804039)
आगंतुक पटल : 357