माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या) महिला विश्वचषकाचे आकाशवाणीवर थेट प्रसारण

Posted On: 08 MAR 2022 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मार्च 2022

 

आपण आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत असताना, आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने या स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून, आयसीसी 2022 महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेते बनण्याच्या दिशेने कूच केली आहे.  आपल्या महिला क्रिकेट संघाची ही अभिमानास्पद घोडदौड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रसारण आकाशवाणीवर समालोचनाच्या माध्यमातून  प्रसार भारती करत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला सुरू झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2022 चे समालोचन आकाशवाणीद्वारे त्यांच्या देशभरातील सर्व प्राथमिक वाहिन्या, एआयआर एफएम रेनबो नेटवर्क, डीआरएम आणि डीटीएच वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे.

प्रसारण अधिक रंजक आणि आकर्षक बनवण्यासाठी, आकाशवाणीद्वारे विशेष स्टुडिओ आधारित कार्यक्रम सादर केले जातील. यात तज्ञ मंडळी विविध स्तरांवरील स्पर्धेतील सर्व घडामोडींवर आपली मते आणि भूमिका मांडतील. हे कार्यक्रम संवादात्मक आणि द्विभाषिक – हिंदी आणि इंग्रजी असतील.

दर्शकांना आकाशवाणीवर खिळवून ठेवण्यासाठी, हे अभ्यासपूर्ण कार्यक्रम सामने सुरू होण्यापूर्वी, विश्रांती दरम्यान आणि सामन्यानंतर प्रसारित केले जातील. आमच्या डिजिटल प्रेक्षकांसाठी, हे कार्यक्रम प्रसार भारती स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीवर देखील उपलब्ध असतील - https://www.youtube.com/c/PrasarBharatiSports

प्रसारण  सर्वसमावेशक बनवण्यासाठी, देशभरातील आकाशवाणी केन्द्रांद्वारे क्रिकेट सामन्यांच्या ताज्या घडामोडींची दर तासाची माहिती संबंधित प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित केली  जाईल.

स्पर्धेच्या प्रसारणा संबंधित सर्व ताज्या माहितीसाठी, ऑल इंडिया रेडिओ स्पोर्ट्स @akashvanisports आणि दूरदर्शन स्पोर्ट्स @ddsportschannel च्या ट्विटर हँडलवर संपर्कात रहा.

तुम्ही या एफएम रेन्बो वाहिनीवर क्रिकेट समालोचनाचे थेट प्रसारण ऐकू शकता:

 

या डीआरएम वाहिन्यांवरही क्रिकेट समालोचनाचे थेट प्रसारण उपलब्ध असेल:

 

* * *

S.Thakur/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1803914) Visitor Counter : 269