शिक्षण मंत्रालय
बनावट संकेतस्थळाबद्दल स्पष्टीकरण
Posted On:
07 MAR 2022 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2022
साध्या-भोळ्या अर्जदारांना फसवण्यासाठी काही लोकांनी शिक्षण विभागाच्या योजनांच्या नावाशी साधर्म्य असलेली (उदा. www.sarvashiksha.online, https://samagra.shikshaabhiyan.co.in, https://shikshaabhiyan.org.in) बनावट संकेतस्थळे तयार केली असल्याचे शिक्षण मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे.
या संकेतस्थळांची रचना सरकारी संकेतस्थळांप्रमाणे असते, मात्र त्यांना भेट देणाऱ्या लोकांना नोकरीचे आमिष दाखवून दिशाभूल करून त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते. अशी काही संकेतस्थळे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाला आढळली आहेत, परंतु आणखीही अनेक अशी नोकरीच्या बदल्यात पैशाची मागणी करणारी बनावट संकेतस्थळे/ समाजमाध्यमांवरील अकाउंट्स अस्तित्वात असू शकतात.
त्यामुळे सर्व नागरिकांना असे आवाहन करत आहोत, कि त्यांनी अशा संकेतस्थळांवर नोकरीसाठी आवेदन करण्यापूर्वी ती अधिकृत आहेत कि नाही याची खात्री करून घ्यावी. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, अथवा कार्यालयात दूरध्वनी करून, ईमेल करून अथवा प्रत्यक्ष भेट देऊन माहिती पडताळून पाहावी. अशा बनावट संकेतस्थळांवर अर्ज करणारे नागरिक त्यांच्या स्वतःच्या जोखमीवर करतील आणि त्यासाठीच्या परिणामांना ते स्वतः जबाबदार राहतील.
* * *
N.Chitale/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803737)
Visitor Counter : 311