कोळसा मंत्रालय

केंद्रीय कोळसा मंत्रालय, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 7 मार्च पासून “विशेष सप्ताह” साजरा करणार

Posted On: 05 MAR 2022 3:12PM by PIB Mumbai

 

भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचा स्मरणीय प्रसंग साजरा करण्यासाठी आणि देशाने अमृतकाळात प्रवेश केलेला असताना, केंद्रीय कोळसा मंत्रालय 7 मार्च ते 11 मार्च 2022 या आठवड्याभरात विशेष सप्ताह साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित  करण्यात येत असलेल्या या सप्ताहात देशभरात मंत्रालयातर्फे विशेष समारंभ आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

केंद्रीय कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे 7 मार्च 2022 रोजी नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात (भीम सभागृह) होणाऱ्या कार्यक्रमात विशेष सप्ताह सोहोळ्याचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या सचिवांसह इतर वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मंत्रालयांतील आणि सार्वजनिक उपक्रमांतील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोळसा क्षेत्रामध्ये देशाने केलेल्या प्रगती बद्दल आणि आजच्या काळात या क्षेत्राच्या समर्पकतेबद्दल बोलण्यासाठी या कार्यक्रमात अनेक विषय तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे.  

विशेष सप्ताह उत्सवाचा भाग म्हणून मंत्रालयाने कोळसा क्षेत्रात भारताने करून दाखविलेल्या उत्तम कामगिरीचे दर्शन घडविणारे आणि भविष्यात मंत्रालयाच्या प्रगतीचा आराखडा निश्चित करण्यात उपयुक्त ठरणारे अनेक स्मरणीय कार्यक्रम आणि उपक्रमांचे नियोजन केले आहे. तसेच मंत्रालयाने शाश्वत खनन, कार्बन पदचिन्हे कमी करणे आणि कार्बन मुक्त परिसंस्थेचे ध्येय साध्य करणे, प्रभावी उत्खनन कार्यातून आयात कोळशाला पर्याय शोधण्यासाठी खाण परिसरात वास्तव्य करणारे स्थानिक समुदाय आणि ग्रामीण जनता यांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी तसेच कोळशापासून कोल बेड मिथेन आणि हायड्रोजन यांच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक स्वच्छ कोळसा तंत्रज्ञान उदयाला आणणे या क्षेत्रांमध्ये सुरु केलेले उपक्रम तसेच संपादन केलेले यश यांची माहिती देखील या कार्यक्रमात ठळकपणे सादर करण्यात येईल. 

उर्जा सुरक्षा तसेच शाश्वत विकासाची सुनिश्चिती आणि कोळसा स्त्रोतांची संपूर्ण क्षमता वापरणे आणि आपल्या उर्जाविषयक सुरक्षित राखणे या आत्मनिर्भर भारताच्या जुळ्या ध्येयांच्या पूर्तीच्या दिशेने कार्य करणे हे केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे अधिक विस्तारित घोषित ध्येय आहे.

***

S.Thakur/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1803159) Visitor Counter : 245