वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि बांगलादेश दरम्यान नवी दिल्लीत वाणिज्य सचिव स्तरावरील बैठक संपन्न
प्रविष्टि तिथि:
05 MAR 2022 10:04AM by PIB Mumbai
भारत आणि बांगलादेश दरम्यान वाणिज्य सचिव स्तरावरील बैठक 4 मार्च 2022 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व भारत सरकारचे वाणिज्य सचिव बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम आणि बांगलादेश शिष्टमंडळाचे नेतृत्व बांगलादेशच्या वाणिज्य मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव तपन कांती घोष यांनी केले.
रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, बंदर पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (सीईपीए), बॉर्डर हाट, मल्टी-मोडल वाहतुकीद्वारे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी, मानकांचे सुसूत्रीकरण तसेच परस्पर मान्यता करारासह विविध मुद्द्यांवर उभय पक्षांनी विस्तृत चर्चा केली.
व्यापारावरील संयुक्त कृती गटाच्या (JWG) 14 व्या बैठकीपूर्वी 2-3 मार्च रोजी नवी दिल्लीत भारत आणि बांग्लादेशच्या वाणिज्य मंत्रालयांच्या संयुक्त/अतिरिक्त सचिव स्तरावरील ही बैठक झाली. परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांवर यात व्यापक चर्चा झाली.
संयुक्त कृती गट आणि वाणिज्य सचिवांच्या पुढील बैठका बांगलादेशमध्ये परस्पर सोयीच्या तारखांना आयोजित करण्याबाबत सहमती झाली
***
ST/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1803131)
आगंतुक पटल : 261