राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि चेंज ऑफ गार्ड सोहळा पुढील आठवड्यापासून जनतेला पाहण्यासाठी पुन्हा खुला होणार

Posted On: 04 MAR 2022 9:33PM by PIB Mumbai

 

कोविड-19 मुळे राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय  संकुलाची जनतेसाठी 1 जानेवारी 2022 पासून बंद करण्यात आलेली सफर  आणि चेंज ऑफ गार्ड सोहळा पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार आहे.

राष्ट्रपती भवन संग्रहालय संकुल 8 मार्च 2022 (मंगळवार) पासून जनतेला पाहण्यासाठी खुले होईल.राजपत्रित  सुट्ट्या वगळता मंगळवार ते रविवार (आठवड्यातील सहा दिवस) हे संग्रहालय संकुल खुले राहील.  पूर्व - नोंदणी  केलेल्यांना  निश्चित  कालावधीच्या चार निर्धारित वेळांमध्ये प्रति स्लॉट 50 अभ्यागतांच्या कमाल मर्यादेसह संग्रहालयात  परवानगी दिली जाईल. नेमून दिलेल्या निर्धारित वेळा  सकाळी 9.30 -सकाळी 11,सकाळी 11. 30 - दुपारी 1 , दुपारी 1.30 - दुपारी 3 आणि दुपारी 3. 30  - संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल.

जनतेला 12 मार्च 2022 पासून राष्ट्रपती भवन पाहता येईल. प्रत्येक शनिवार आणि रविवारी (राजपत्रित सुट्ट्या वगळता)  पूर्व नोंदणी केलेल्यांना  निश्चित करण्यात आलेल्या कालावधीच्या  सकाळी 10, 30-  11.30 , दुपारी 12. 30-1.30 आणि दुपारी 2.30 ते 3.30 या तीन  स्लॉट्समध्ये कमाल 25  अभ्यागतांच्या मर्यादेसह हा दौरा करता येईल. नव्याने विकसित केलेले आरोग्य वनम देखील राष्ट्रपती भवन सफरचा भाग असेल.

12 मार्च 2022 पासून प्रत्येक शनिवारी (राजपत्रित सुटी वगळता) सकाळी 8.00 ते 9. 00 या वेळेत चेंज ऑफ गार्ड सोहळा होईल.

राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि चेंज ऑफ गार्ड समारंभ पाहण्यासाठी http://rashtrapatisachivalaya.gov.in/rbtour/  येथे ऑनलाइन नोंदणी करता येईल.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1803072) Visitor Counter : 197