आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 178.29 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
गेल्या 24 तासात 24.84 लाख लसीकरण मात्रा दिल्या गेल्या.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.84%,
गेल्या 24 तासात 6,396 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 69,897
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.90%
Posted On:
04 MAR 2022 9:43AM by PIB Mumbai
गेल्या 24 तासात 24.84 (24,84,412) लाख लसीींच्या मात्रा देण्यात आल्याने भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 178.29 (1,78,29,13,060) कोटी मात्रा देण्याचा टप्पा पार केला आहे.
2,06,05,684 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,01,859
|
2nd Dose
|
99,71,780
|
Precaution Dose
|
42,14,216
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,10,046
|
2nd Dose
|
1,74,51,962
|
Precaution Dose
|
63,12,690
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
5,51,46,865
|
2nd Dose
|
2,94,46,462
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,22,22,294
|
2nd Dose
|
44,72,33,716
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,23,40,255
|
2nd Dose
|
18,08,32,789
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,64,67,129
|
2nd Dose
|
11,26,18,005
|
Precaution Dose
|
98,42,992
|
Precaution Dose
|
2,03,69,898
|
Total
|
1,78,29,13,060
|
गेल्या 24 तासांत 13,450 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,23,67,070 झाली आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.64% झाला आहे.
गेल्या 24 तासात 6,396 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 69,897 आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.16% आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 9,23,351 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77 कोटी 9 लाखांहून (77,09,73,356) लाखांहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.90% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.69% आहे.
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1802839)
Visitor Counter : 240