वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पीयूष गोयल यांनी जागतिक व्यापारातला भारताचा वाटा 10% पर्यंत वाढवण्याचे केले आवाहन


“आज इतर देश देखील आत्मनिर्भर भारत सारख्या कार्यक्रमांबद्दल बोलत आहेत; आज जगाला भारताचे अनुकरण करायचे आहे”: गोयल

Posted On: 03 MAR 2022 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मार्च 2022

 

वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जागतिक व्यापारात भारताचा वाटा 10% पर्यंत वाढवण्याचे आणि जीडीपी  मधील निर्यातीचा हिस्सा 25% पर्यंत नेण्याचे आवाहन केले.

“ही  महत्त्वाकांक्षी लक्ष्ये आहेत, परंतु ती  शक्य आहेत  असे मला वाटते,” असे  गोयल यांनी ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात  वेबिनारच्या समारोप सत्राला संबोधित करताना सांगितले.

गोयल म्हणाले की, पंतप्रधानांनी वेबिनारच्या उद्घाटनपर भाषणात, निर्मितीला  प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताला स्वयंपूर्ण बनविण्यावर भर दिला.

“आज इतर देश देखील आत्मनिर्भर भारत सारख्या कार्यक्रमांबद्दल बोलत आहेत. आणि मला वाटते की या संकल्पनेचे  महत्त्व आणि यश याचे  यापेक्षा चांगले समर्थन असू शकत नाही आणि आज जगाला भारताचे अनुकरण करायचे आहे,”  असे ते म्हणाले.

गोयल यांनी जागतिक सेवा व्यापारात भारताला आघाडीच्या 3 राष्ट्रांमध्ये नेण्याचे आवाहन केले. त्यांनी परदेशी व्यापारात एमएसएमईना  सहाय्य करण्याचे  आवाहन केले, तसेच पुढील 25 वर्षात भारत @100 अमृत काळाकडे भारत मार्गक्रमण करत असताना तंत्रज्ञानात आघाडीवर राहण्यासाठी अव्वल  10 संशोधन आणि विकास प्रयोगशाळा /इनोव्हेशन सेंटर्स उभारण्याचे आवाहन केले.

संरक्षण यंत्रणा वगळता ड्रोन क्षेत्रासाठी सरकार अधिक उदार नियामक व्यवस्थेचा विचार करत  आहे असे सांगून  गोयल म्हणाले की, उद्योगानी  भारताला ड्रोनचे निर्मिती  केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. त्यांनी पूर्ण मूल्य साखळीत  गुणवत्तेचे एकत्रीकरण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की अंतिम उत्पादन तयार होईपर्यंत त्याचा प्रसार करू नये. 

उद्योगासाठी उद्याची तांत्रिक कौशल्ये विकसित करण्याची गरज अधोरेखित करून,  गोयल यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमांना "आजच्या गरजां" नुसार सुसंगत बनवण्याची गरज अधोरेखित केली.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802782) Visitor Counter : 192