संरक्षण मंत्रालय
डेफ एक्सपो (DefExpo) 2022 दरम्यान जास्तीत जास्त लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हायब्रिड( ऑनलाईन आणि ऑफलाईन) परिसंवादांचे आयोजन
Posted On:
03 MAR 2022 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2022
संरक्षण मंत्रालयाने 10-14 मार्च 2022 या कालावधीत गांधीनगर, गुजरात येथे प्रतिष्ठेच्या द्विवार्षिक संरक्षण प्रदर्शन, डेफ एक्सपो (DefExpo) 2022 च्या 12 व्या आवृत्तीचे आयोजन केले आहे.
हे भव्य आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन भूदल, हवाई, नौदल, देशांतर्गत सुरक्षा आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालींवर केंद्रित आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या धोरणात्मक उपक्रमामुळे भारतामध्ये जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून उदयास येण्याची प्रचंड क्षमता असल्याचा सरकारला विश्वास वाटत आहे. त्यामुळे डेफ एक्स्पो 2022 साठी हीच संकल्पना स्वीकारण्यात आली आहे.
डेफ एक्सपो (DefExpo) परिसंवाद हायब्रीड(ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून) स्वरूपात आयोजित केले जातील, यामुळे वक्ते तसेच श्रोत्यांना विविध परिसंवादांमध्ये आभासी माध्यमातून सहभागी होता येईल.
आघाडीचे उद्योग मंच, आंतरराष्ट्रीय मंच, थिंक टँक, प्रसारमाध्यमे, भारतीय उद्योग, डीआरडीओ, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, राज्य सरकारे इत्यादींद्वारे जगभरात प्रसारित होणारे परिसंवाद आयोजित केले जातील.
या परिसंवादांची संकल्पना निर्यात आणि भविष्यावर आधारित आहे. भारतातील नागरी उड्डाण, संशोधन आणि विकास, संघर्षाचे भविष्य, एरो इंजिन आणि एमआरओ, गुंतवणुकीच्या संधींबद्दल राज्य सरकारांचे जनसंपर्क कार्यक्रम इ.
संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय तज्ञांना परिसंवादासाठीवक्ते म्हणून आमंत्रित केले आहे. परिसंवादाचे तपशील DefExpo 2022 संकेतस्थळ (https://defexpo.gov.in/) आणि DefExpo 2022 मोबाइल अॅपवर उपलब्ध आहेत.
DEFEXPO 2022 परिसंवादाचे वेळापत्रक
* * *
S.Patil/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1802692)
Visitor Counter : 259